ETV Bharat / sports

जेम्स अँडरसनकडून वॉबल सीम शिकलो - ऑली रॉबिन्सन

अनुभवी साथीदार जेम्स अँडरसन याने मला वॉबल ग्रीप बॉलची टेकनिक बदलण्यात मदत केली. ज्याचे परिणाम भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाले असल्याचे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन याने सांगितलं.

author img

By

Published : Aug 29, 2021, 4:53 PM IST

England vs India : Learnt wobble seam delivery from James Anderson: Ollie Robinson
जेम्स अँडरसनकडून वॉबल सीम शिकलो - ऑली रॉबिन्सन

लीड्स - इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या सुरूवातीला भारतीय संघ 2 बाद 215 असा सुस्थितीत होता. पण त्यानंतर भारताचा संपूर्ण संघ 278 धावांत ऑलआउट झाला आणि भारताचा एक डाव आणि 76 धावांनी पराभव झाला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. 7 गडी बाद करणारा ऑली रॉबिन्सन सामनावीर ठरला. त्याने चौथ्या दिवशी नव्या चेंडूवर भारतीय दिग्गजांना अक्षरश: नाचवले. या डावात त्याने 26 षटके गोलंदाजी करताना 65 धावा देत 5 गडी बाद केले.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन याने विजयानंतर बोलताना सांगितलं की, 'अनुभवी साथीदार जेम्स अँडरसन याने मला वॉबल ग्रीप बॉलची टेकनिक बदलण्यात मदत केली. ज्याचे परिणाम भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाले.'

मी पाहिलं की, जेम्स अँडरसनने गोलंदाजी करताना वॉबल ग्रीप थोडेसे वेगळ्या पद्धतीने पकडले होते. मी याला दुसऱ्या बाजूने पकडत होतो. यामुळे मी याविषयावर अँडरसनशी चर्चा केली. तेव्हा त्याने सांगितलेल्या प्रकारे नेटमध्ये सराव केला. यानंतर याचा वापर मी सामन्यात केला आणि याचा फायदाही झाला. हा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. कारण माझ्या पहिल्या कसोटीतच विजय मिळाला, असे देखील रॉबिन्सन बोलताना म्हणाला.

विराट कोहलीच्या विकेट बद्दल बोलताना ऑली रॉबिन्सन म्हणाला की, 'हा अद्भभूत अनुभव आहे. येथील प्रेक्षक अविश्वसनीय होते. जेव्हा आम्ही विराटला बाद केले तेव्हा प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. विराटची विकेट घेणे हा माझ्यासाठी खूप चांगला अनुभव होता.'

हेही वाचा - सुर्यकुमार यादवला अंतिम संघात स्थान द्या, दिलीप वेंगसकरचा सल्ला

हेही वाचा - IND VS ENG: रविंद्र जडेजाला दुखापत, भारतीय संघाच्या अडचणीत वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.