चेन्नई - भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर दुसर्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्याद्वारे तब्बल एका वर्षानंतर प्रेक्षक स्टेडियममध्ये परतले आहेत. या संदर्भात तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने सुमारे २५ हजार तिकिटे ऑनलाइन विकली आहे.
एक वर्षाहून अधिक काळानंतर भारतीय संघ त्यांच्या घरी प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळत आहे. गेल्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेचा संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतात आला होता. या सामन्यापर्यंत प्रेक्षक स्टेडियममध्ये येत होते.
हेही वाचा - भारत-इंग्लंड दुसरी कसोटी : भारताने जिंकली नाणेफेक, प्रथम करणार....
यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला, तोपर्यंत कोरोनाबाबतची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. त्यामुळे तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रद्द करण्यात आली. कोरोनामुळे गेल्या वर्षी आयपीएलचे आयोजनही यूएईमध्ये केले गेले. यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर गेला. तिथे मर्यादित प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी होती.
भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये पाच एकदिवसीय सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल.