चेन्नई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसर्या कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज आणि इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स यांच्यात जुंपल्याचे पाहायला मिळाले. भारतीय डावाच्या ८७व्या षटकात जो रूट गोलंदाजी करत होता. त्यावेळी स्लिपमध्ये उभा असलेल्या स्टोक्सने फलंदाजी करणाऱ्या पंतविषयी टिपणी केली.
हेही वाचा - आयपीएल लिलाव : ४२ वर्षीय क्रिकेटपटूसाठी कोण लावणार बोली?
स्टोक्सचे हे वर्तन पाहून पंतने सामना थांबवत आणि त्याच्याकडे पाहत प्रत्युत्तर दिले. षटक संपल्यानंतरही हे दोघे शाब्दिक विवाद करताना दिसले. मात्र, पंच वीरेंद्र शर्मा यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही खेळाडूंनी वाद थांबवला. या भांडणाचे खरे कारण समजू शकले नाही.
-
Rishabh Pant vs Stokes fight today 👇🏻👇🏻 pic.twitter.com/P8a0mbO5d1
— middle stump (@middlestump4) February 13, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Rishabh Pant vs Stokes fight today 👇🏻👇🏻 pic.twitter.com/P8a0mbO5d1
— middle stump (@middlestump4) February 13, 2021Rishabh Pant vs Stokes fight today 👇🏻👇🏻 pic.twitter.com/P8a0mbO5d1
— middle stump (@middlestump4) February 13, 2021
स्टोक्स आणि पंत यांच्यातील संघर्ष पाहून स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांनी पंतच्या नावाची घोषणाबाजी सुरू केली. भारताचा माजी फलंदाज वसिम जाफरने रिषभच्या फोटोवरून एक मजेदार ट्विट केले आहे. ''जब तक ये खेल खत्म नहीं होता अपून इधरीच है!'', असे जाफरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
-
"Jab tak ye khel khatam Nahi hota apun idharich hai!" #INDvsENG pic.twitter.com/OqIudUdlGR
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) February 13, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">"Jab tak ye khel khatam Nahi hota apun idharich hai!" #INDvsENG pic.twitter.com/OqIudUdlGR
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) February 13, 2021"Jab tak ye khel khatam Nahi hota apun idharich hai!" #INDvsENG pic.twitter.com/OqIudUdlGR
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) February 13, 2021
पहिल्या दिवशी भारताचे त्रिशतक -
रोहित शर्माच्या द्विशतकी आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ६ बाद ३०० धावा केल्या आहेत. वरच्या फळीचे तीन फलंदाज स्वस्तात गमावल्यानंतर रोहित आणि अजिंक्यने १६२ धावांची भागीदारी रचली. फिरकी गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर रोहितने आक्रमक पवित्रा धारण करत १६१ धावा तडकावल्या. त्याच्या खेळीत १८ चौकार आणि २ चौकारांचा समावेश होता. तर, अजिंक्यने १४९ चेंडू खेळून काढत ४ चौकार आणि एका षटकारासह ६७ धावांची खेळी केली.