ETV Bharat / sports

भारतीय भूमीवर सिराजचा पराक्रम, ८९ वर्षानंतर नोंदवली भन्नाट कामगिरी - मोहम्मद सिराज कसोटी न्यूज

इंग्लंडचा खेळाडू ओली पोपला पहिल्या डावात बाद करून सिराजने ही चमकदार कामगिरी केली. यष्टिरक्षक रिषभ पंतने सिराजच्या चेंडूवर ओली पोपचा झेल टिपला. ८९ वर्षांच्या कसोटी इतिहासात घरच्या मैदानावरील पहिल्या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर कोणत्याही भारतीय खेळाडूला विकेट घेता आली नव्हती. मात्र, २६ वर्षीय सिराजने हा पराक्रम करून दाखवला.

सिराज
सिराज
author img

By

Published : Feb 15, 2021, 11:09 AM IST

चेन्नई - इंग्लंडविरुद्ध चेन्नईत सुरू असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात भारताचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने एक नवा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर भारतीय संघाच्या ऐतिहासिक कसोटी मालिकाविजयाचा भाग असलेल्या सिराजने भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. अशी कामगिरी करणारा सिराज भारताचा पहिलाच खेळाडू ठरला.

इंग्लंडचा खेळाडू ओली पोपला पहिल्या डावात बाद करून सिराजने ही चमकदार कामगिरी केली. यष्टिरक्षक रिषभ पंतने सिराजच्या चेंडूवर ओली पोपचा झेल टिपला. ८९ वर्षांच्या कसोटी इतिहासात घरच्या मैदानावरील पहिल्या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर कोणत्याही भारतीय खेळाडूला विकेट घेता आली नव्हती. मात्र, २६ वर्षीय सिराजने हा पराक्रम करून दाखवला.

हेही वाचा - माजी क्रिकेटपटू युवराज सिंगवर एफआयआर दाखल

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत सिराजला पाच षटके टाकण्याची संधी मिळाली. यात त्याने ५ धावा देत १ बळी घेतला. यात त्याने चार षटके निर्धाव टाकली. सिराजपूर्वी माजी भारतीय खेळाडू सुरेश रैनाने भारतात खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या चेंडूवर विकेट घेतली होती. २०१०मध्ये रैनाने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला माघारी धाडले होते.

सिराजचे स्वप्नवत कसोटी पदार्पण -

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजला पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि त्याने तीन सामन्यांत १३ खेळाडूना बाद केले. ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या अखेरच्या कसोटी सामन्यात सिराजने दुसर्‍या डावात ७३ धावा देऊन ५ घेतले. या दौऱ्यावर सिराजच्या वडिलांचे निधन झाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.