ETV Bharat / sports

खास सामन्यात रूटचे शतक आणि हॅट्ट्रिक!

आपल्या १०० व्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा रूट हा जगातील नववा तर इंग्लंडचा तिसरा फलंदाज ठरला आहे. भारताचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर एक धाव घेत रूटने आपले शतक पूर्ण केले.

joe root
joe root
author img

By

Published : Feb 5, 2021, 6:11 PM IST

चेन्नई - आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या नाबाद शतक खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या दिवसअखेर ३ बाद २६३ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे रूटचा हा १००वा कसोटी सामना आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रूट १४ चौकार आणि एका षटकारासह १२८ धावांवर नाबाद होता.

हेही वाचा - पुण्याच्या लिसा स्थळेकरला 'हॉल ऑफ फेम'चा सन्मान

आपल्या १०० व्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा रूट हा जगातील नववा तर इंग्लंडचा तिसरा फलंदाज ठरला आहे. भारताचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर एक धाव घेत रूटने आपले शतक पूर्ण केले. कॉलिन काउड्रे, जावेद मियांदाद, गॉर्डन ग्रीनिज, एलेक स्टीवर्ट, इंझमाम-उल-हक, रिकी पाँटिंग (दोन्ही डावात शतके), ग्रॅमी स्मिथ आणि हाशिम अमला यांनी रूटच्या आधी आपल्या १००व्या कसोटी सामन्यात शतके ठोकली आहेत. २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही डावात पाँटिंगने शतके ठोकली होती. हा पाँटिंगचा १००वा कसोटी सामना होता.

रुटची हॅट्ट्रिक -

महत्त्वाचे म्हणजे रूटचे हे सलग तिसरे शतक आहे. रूट आपल्या ९८व्या, ९९व्या आणि १००व्या कसोटी सामन्यात शतक ठोकणारा पहिला क्रिकेटपटूही ठरला आहे. यापूर्वी त्याने श्रीलंका दौर्‍यावर दोन शतके ठोकली होती.

एकाच देशाविरुद्ध पहिला आणि १०० वा कसोटी सामना खेळणारा रूट तिसरा क्रिकेटपटूही ठरला आहे. रूटने २०१२ मध्ये भारताविरुद्ध नागपूर कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. रूटच्या आधी वेस्ट इंडीजच्या कार्ल हूपर आणि भारताचा कपिल देव यांनीही एकाच देशाविरुद्ध पहिला आणि १००वा कसोटी सामना खेळला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.