ETV Bharat / sports

पहिली कसोटी पाहुण्यांची, इंग्लंडचा भारतावर 'मोठा' विजय

चेन्नईच्या चेपॉक मैदानावर रंगलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारतावर २२७ धावांनी विजय मिळवला आहे. इंग्लंडच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव १९२ धावांवर आटोपला.

IND vs ENG
IND vs ENG
author img

By

Published : Feb 9, 2021, 12:17 PM IST

Updated : Feb 9, 2021, 2:26 PM IST

चेन्नई - जॅक लीच आणि जेम्स अँडरसनच्या भन्नाट गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने भारताला सर्वबाद करत पहिल्या कसोटीत मोठा विजय नोंदवला आहे. इंग्लडने भारताला विजयासाठी ४२० धावांचे आव्हान दिले होते. मात्र, भारतीय संघ दुसऱ्या डावात १९२ धावाच करू शकला. त्यामुळे इंग्लंडने भारतावर २२७ धावांनी विजय नोंदवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. संघाचा कर्णधार विराट कोहली आणि शुबमन गिल यांच्याव्यतिरिक्त इतर फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. पहिल्या डावात द्विशकी खेळी साकारणाऱ्या जो रूटला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

काल म्हणजेच चौथ्या दिवसअखेर इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवर रोहित शर्मा अपयशी ठरला. जॅक लिचच्या गोलंदाजीवर तो १२ धावांवर त्रिफाळाचित झाला. त्यानंतर आज पाचव्या दिवशी फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा अवघ्या १५ धावांची भर घालून तंबूत परतला. जॅक लीचने त्याला स्टोक्सकरवी झेलबाद केले. तर, लयात आलेल्या शुबमन गिलला अँडरसनने बाद केले. गिलने ७ चौकार आणि एका षटकारासह ५० धावा केल्या. त्यानंतर मैदानात आलेल्या उपकर्णधार अजिंक्य रहाणेला भोपळाही फोडता आला नाही. ३८ वर्षीय अँडरसनने अप्रतिम चेंडू टाकत त्याची दांडी गुल केली. पहिल्या डावात सुंदर खेळी केलेले रिषभ पंत (११) आणि वॉशिंग्टन सुंदर (०) या डावात अपयशी ठरले. अँडरसनने पंतला बाद केले.

हेही वाचा - ''आमच्या शेतकरी बापासाठी...'', सचिनच्या घराबाहेर पोस्टर झळकावून आंदोलन

दुसऱ्या बाजूला विराटने अर्धशतक साकारत संघाला पराभवापासून वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या बाजूने त्याला कोणाचीही साथ लाभली नाही. दुसऱ्या बाजूला असलेल्या अश्विनला लीचने ९ धावांवर बाद केले. काही धावांच्या फरकानंतर विराटही बाद झाला. बेन स्टोक्सने त्याचा त्रिफळा उडवला. विराटने ९ चौकारांसह ७२ धावा केल्या. इंग्लंडच्या गोलंदाजांना भारताच्या तळाच्या फलंदाजांना बाद करायला वेळ लागला नाही. इंग्लंडकडून लीचने चार, अँडरसनने तीन,आणि आर्चर, स्टोक्स आणि बेसने प्रत्येकी एक गडी बाद केला.

कसोटी मालिकेचा पुढील सामना १३ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर खेळवण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे या कसोटीत प्रेक्षक असणार आहेत.

संक्षिप्त धावफलक -

  • नाणेफेक - इंग्लंड(फलंदाजी)
  • इंग्लंड पहिला डाव - सर्वबाद ५७८ (जो रूट २१८; बुमराह ८४/३)
  • भारत पहिला डाव - सर्वबाद ३३७ (ऋषभ पंत ९१; डॉम बेस ७६/४)
  • इंग्लंड दुसरा डाव - सर्वबाद १७८ (जो रूट ४०; अश्विन ६१/६)
  • भारत दुसरा डाव - सर्वबाद १९२ (विराट कोहली; लीच ७६/४)

Last Updated : Feb 9, 2021, 2:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.