ETV Bharat / sports

....म्हणून बेन स्टोक्ससाठी अश्विन घातक!

author img

By

Published : Feb 26, 2021, 12:32 PM IST

अश्विनने आतापर्यंतच्या ७७ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत ११व्यांदा स्टोक्सला तंबूत धाडले आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकला नऊ वेळा तर, ऑस्ट्रेलियाचा एड कोवेन आणि जेम्स अँडरसन यांना सात वेळा अश्विनने बाद केले आहे. मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात अश्विनने कसोटीत ४०० बळींचा आकडा पार केला. इंग्लंडचा फलंदाज जोफ्रा आर्चरला पायचित पकडत अश्विनने हा विक्रम रचला.

स्टोक्ससाठी अश्विन घातक
स्टोक्ससाठी अश्विन घातक

अहमदाबाद - भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ४०० बळी घेण्याची किमया केली आहे. या पराक्रमासोबत त्याने अजून एका विक्रमाची नोंद केली. ३४ वर्षीय अश्विनने कसोटीत सर्वाधिक वेळा बेन स्टोक्सला बाद केले आहे. अश्विनने आतापर्यंतच्या ७७ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत ११व्यांदा स्टोक्सला तंबूत धाडले आहे. यानंतर त्याने १०वेळा ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला बाद केले.

अश्विन
अश्विन

इंग्लंडचा माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकला नऊ वेळा तर, ऑस्ट्रेलियाचा एड कोवेन आणि जेम्स अँडरसन यांना सात वेळा अश्विनने बाद केले आहे. मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात अश्विनने कसोटीत ४०० बळींचा आकडा पार केला. इंग्लंडचा फलंदाज जोफ्रा आर्चरला पायचित पकडत अश्विनने हा विक्रम रचला.

अश्विनचा कसोटी बळींचा प्रवास...

नोव्हेंबर २०११मध्ये दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर अश्विनने वेस्ट इंडीजचा फलंदाज डॅरेन ब्राव्होला बाद करत पहिला कसोटी बळी घेतला. त्यानंतर त्याने ५०वा कसोटी बळी नोव्हेंबर २०१२ मध्ये निको कॉम्पटनच्या रुपात मिळवला. मुंबईत २०१३मध्ये खेळलेल्या कसोटीत डॅरेन सॅमीला बाद करत अश्विनने १०० कसोटी बळींची नोंद केली. २०१५मध्ये त्याने आफ्रिकेच्या इम्रान ताहीरला बाद करत कसोटीत १५० बळी घेतले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन अश्विनचा २००वा कसोटी बळी ठरला. २०१७मध्ये बांगलादेशचा मुशफिकुर रहीम अश्विनचा २५०वा कसोटी बळी ठरला. २०१७मध्ये लाहिरू गमगे ३००वा तर, २०१९मध्ये थिएनुस डिब्रुइन अश्विनचा ३५०वा कसोटी बळी ठरला.

अश्विनपूर्वी कपिल देव, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये ४०० बळी घेतले आहेत. कुंबळेने १३२ कसोटी सामन्यात ६१९, कपिल देवने १३१ कसोटी सामन्यात ३४३ आणि हरभजनने १०३ कसोटी सामन्यांत ४१७बळी घेतले आहेत. अश्विन सर्वात जलद ४०० विकेटचा टप्पा गाठणारा जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. अश्विनच्याआधी श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथैया मुरलीधरन याचे नाव येतं. मुरलीधरनने ७२ कसोटीत ४०० विकेटचा टप्पा गाठला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.