Eng vs SL: पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा श्रीलंकेवर मोठा विजय, ९१ चेंडू राखत जिंकला सामना - इंग्लंड
इंग्लंडने श्रीलंकेचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात ५ गडी राखून धुव्वा उडवला आणि तीन सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.
चेस्टर ली स्ट्रीट (इंग्लंड) - टी-२० मालिकेत क्लिन स्वीप मिळाल्यानंतरही श्रीलंका संघाने आपली कामगिरीत सुधारणा केली नाही. इंग्लंडने श्रीलंकेचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात ५ गडी राखून धुव्वा उडवला आणि तीन सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा वेगवान गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने श्रीलंकेला १८५ धावांत रोखले. त्यानंतर हे आव्हान ३४.५ षटकात ५ गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.
श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टो आणि लिओम लिविंगस्टोन या सलामीवीर जोडीने ४.५ षटकात ५४ धावांची सलामी दिली. बेयरस्टोने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. लिविंगस्टोनला (९) करुणारत्ने याने चमिराकरवी झेलबाद केले. लिविंगस्टोन पाठोपाठ जॉनी बेयरस्टो देखील माघारी परतला. त्याला फर्नांडोने क्लिन बोल्ड केले. पण बेयरस्टो याने २१ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह ४३ धावा चोपल्या.
कर्णधार इयॉन मॉर्गन (६), सॅम बिलिंग्ज (३) स्वस्तात बाद झाले. मॉर्गन आणि बिलिंग्ज यांना चमिराने बाद केले. जो रुटने एक बाजू लावून धरत अर्धशतक झळकावले. दुसऱ्या बाजूने त्याला मोईन अलीने चांगली साथ दिली. संघाची धावसंख्या १७१ असताना मोईन अली चमिराच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. तेव्हा रुट आणि सॅम कुरेन यांनी संघाच्या विजयावर शिक्कोमोर्तब केले. रुटने ८७ चेंडूत ४ चौकारांसह नाबाद ७९ धावांची खेळी साकारली. तर सॅम कुरेन ९ धावांवर नाबाद राहिला.
-
ROOOOOOOT 👏 5⃣0⃣
— England Cricket (@englandcricket) June 29, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard/clips: https://t.co/1qUI0cauCt
🏴 #ENGvSL 🇱🇰 @IGcom pic.twitter.com/r6EDL89waG
">ROOOOOOOT 👏 5⃣0⃣
— England Cricket (@englandcricket) June 29, 2021
Scorecard/clips: https://t.co/1qUI0cauCt
🏴 #ENGvSL 🇱🇰 @IGcom pic.twitter.com/r6EDL89waGROOOOOOOT 👏 5⃣0⃣
— England Cricket (@englandcricket) June 29, 2021
Scorecard/clips: https://t.co/1qUI0cauCt
🏴 #ENGvSL 🇱🇰 @IGcom pic.twitter.com/r6EDL89waG
तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. तेव्हा इंग्लंडच्या वेगवान माऱ्यासमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारली. कुशल परेरा (७३) आणि वाहिंदू हसरंगा (५४) आणि चमिका करुणारत्ने (नाबाद १९) वगळता एकही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. श्रीलंकेचा संघ ४२.३ षटकात १८५ धावांवर सर्वबाद झाला. ख्रिस वोक्सने १० षटकात १८ धावा देत ४ गडी बाद केले. विशेष म्हणजे वोक्सने १० पैकी ५ षटके निर्धाव फेकली. डेव्हिड विलीने तीन गडी बाद करत वोक्सला चांगली साथ दिली. मोईन अलीने १ गडी बाद केला. तर दोन गडी धावबाद झाले.
सामन्यात ख्रिस वोक्स शो
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भेदक गोलंदाजीचा नजराणा पेश केला. पॉवर प्लेमध्ये ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांना एक-एक धाव काढताना अडचणी निर्माण झाल्या. वोक्ससमोर श्रीलंकेच्या फलंदाजाना एवढा संघर्ष केला, की त्यांना पहिल्या ५ षटकामध्ये फक्त ६ धावा काढता आल्या. वोक्सने या सामन्यात सलग ४ षटके निर्धाव फेकल्या. हा विक्रम करणारा वोक्स इंग्लंडचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी स्टुअर्ट ब्रॉडने १३ वर्षांपूर्वी पॉवर प्लेमध्ये ४ षटके निर्धाव फेकली होती.
हेही वाचा - Eng vs Ind : भारतीय खेळाडूंची इंग्लंडमध्ये कुटुंबियासह भटकंती, पाहा फोटो
हेही वाचा - मिताली राजची ICC Women ODI Rankings मध्ये झेप; स्मृती मंधानाची घसरण