लंडन - भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. पण या मालिकेला सुरूवात होण्याआधीच यजमान संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज ओली पोपला दुखापत झाली आहे. यामुळे तो भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे.
२३ वर्षीय ओली पोप सरे क्लबकडून स्थानिक टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळत होता. तेव्हा पोपच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने याची माहिती दिली.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने सांगितलं की, ओली पोप यांच्या डाव्या मांडीचे स्नायू दुखावले गेले आहे. यामुळे तो भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी मैदानात सराव करू शकत नाही.
ईसीबी आणि सरे क्लबच्या डॉक्टरांच्या निघरानी खाली ओली पोपवर उपचार सुरू आहेत. भारताविरुद्धच्या मालिकेआधी पोप फिट झाला पहिजे, यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत.
ओली पोपच्या जागेवर या खेळाडूला मिळू शकते संधी
जर पोप दुखापतीतून सावरला नाही तर त्याच्या जागेवर डेव्हिड मलानला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. मलानने निर्धारित षटकाच्या मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला इंग्लंड संघात स्थान मिळू शकते.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्याची मालिका खेळवण्यात येणार असून उभय संघातील या मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे.
हेही वाचा - Ban vs Zim Test : १५० धावा करून ठरला संकटमोचक; मैदानाबाहेर जाताच केली निवृत्ती जाहीर
हेही वाचा - Ind vs SL : भारत-श्रीलंका सामन्यांच्या वेळापत्रकात बदल, 'या' दिवसापासून मालिकेला सुरूवात, पण...