ETV Bharat / sports

ENG vs IND 1st ODI : रोहित शर्माच्या षटकाराने जखमी झाली चिमुरडी, पहा व्हिडिओ - ENG vs IND Updates

रोहित शर्माच्या बॅटमधून बाहेर निघालेला षटकाराचा चेंडू स्टँडमध्ये बसलेल्या एका चिमुरडीला लागला आणि तिला गंभीर दुखापत ( little girl injured by Rohit six ) झाली. यानंतर मुलीची दुखापत पाहण्यासाठी इंग्लंड संघाचे फिजिओ त्वरित पोहोचले.

little girl injured
जखमी झाली चिमुरडी
author img

By

Published : Jul 13, 2022, 3:38 PM IST

हैदराबाद : लंडनमधील ओव्हल येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय ( ENG vs IND 1st ODI ) सामन्यादरम्यान अशी घटना घडली, जी पाहिल्यानंतर चाहत्यांचे मन हेलावेल. इंग्लंडने दिलेल्या 111 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने स्क्वेअर लेगच्या दिशेने पुल शॉट मारला, ज्यामुळे मैदानावरील एका लहान मुलीला दुखापत झाली ( little girl injured by Rohit six ). या घटनेनंतर काही काळ सामना थांबवण्यात आला, त्यानंतर इंग्लंडचे फिजिओ तातडीने मुलीला पाहण्यासाठी धावले. ही घटना 5व्या षटकात घडली.

ओव्हरच्या तिसऱ्या शॉट पिच बॉलवर रोहितने पुल शॉट मारताना षटकार ( Rohit Sharma Pull Shot Six ) लगावला. षटकार मारल्यानंतर रोहित वळला आणि धवनच्या दिशेने चालू लागला. कॅमेरामन चेंडूचा पाठलाग करत सीमारेषेपर्यंत गेला. यादरम्यान चेंडू एका लहान मुलीला लागल्याचे दिसून आले. चेंडू लागल्यानंतर रडणाऱ्या मुलीला तिच्या कुटुंबीयांनी तिला लगेच उचलले आणि शांत करण्यास सुरुवात केली. यानंतर रोहित शर्मा आणि इंग्लंडचे इतर खेळाडू त्या मुलीकडे काही वेळ बघत राहिले आणि काही काळ सामना थांबवण्यात आला. काही सेकंदांनंतर इंग्लंडचा फिजिओ त्या मुलीकडे धावताना ( England physio ran towards the girl ) दिसला.

सामन्याबद्धल बोलायचे झाले तर भारतीय संघाने ओव्हल मैदानावर मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 10 गडी राखून ( India won by 10 Wickets ) पराभव केला. भारताने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इंग्लंडचा डाव 25.2 षटकांत केवळ 110 धावांवर आटोपला, त्यानंतर भारताने कोणतेही विकेट न गमावता 18.4 षटकांत हे लक्ष्य गाठले. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने या सामन्यात एकूण 6 विकेट घेतल्या. त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाबाद 76 धावांचे योगदान दिले.

हेही वाचा - ENG vs IND: भारताचा इंग्लंडवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 10 गडी राखून विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.