ETV Bharat / sports

Dinesh Karthik Statement : क्रिकेटमध्ये फिनिशरची भूमिका निभावणे सोपे नाही - दिनेश कार्तिक - Dinesh Karthik interaction with Ravichandran Ashwin

भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज दिनेश कार्तिकला ( Batsman Dinesh Karthik ) असे वाटते की, दबाव हाताळण्यापासून ते सामन्याच्या परिस्थितीचे आकलन करणे आणि काही चेंडूंमध्ये स्वत:ला जुळवून घेणे, हे फलंदाज एक चांगला फिनिशर बनण्याचे लक्षण आहे.

Dinesh Karthik
दिनेश कार्तिक
author img

By

Published : Jul 30, 2022, 4:44 PM IST

त्रिनिदाद: यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने ( Wicketkeeper-batsman Dinesh Karthik ) संथ विकेटवर फक्त 19 चेंडूत 213 च्या स्ट्राइक रेटने नाबाद 41 धावा करत धावसंख्या सोपी केली. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 20 षटकात 6 गडी गमावून 190 धावा केल्या आहेत. यानंतर भारताने यजमानांचा 68 धावांनी ( India won by 68 runs ) पराभव करत 1-0 अशी आघाडी घेतली. या विजयानंतर यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने प्रतिक्रिया ( Dinesh Karthik Statement ) दिली.

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकादरम्यान ( ICC T20 World Cup ) भारताच्या मोहिमेत भूमिका बजावण्यास तो उत्सुक असल्याचेही कार्तिकने सांगितले. तो पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्ही मधल्या फळीतील संघासाठी खेळता. तेव्हा परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि चेंडूचे मूल्यांकन, तुम्ही कोणत्या प्रकारचे शॉट्स खेळू शकता या संदर्भात तुम्हाला तुमच्या पायाकडे खूप लक्ष द्यावे लागते.

कार्तिकने बीसीसीआय टीव्हीवर रविचंद्रन अश्विनशी केलेल्या ( Dinesh Karthik interaction with Ravichandran Ashwin ) संभाषणात सांगितले की, रवींद्र जडेजाची विकेट पडल्यानंतर संघाची एकूण धावसंख्या 160-165 होती. तिथे त्याने 'फिनिशर'ची भूमिका बजावली. त्यानंतर स्कोअरमध्ये मोठा फरक दिसून आला. त्याआधी एक काळ असा होता की आम्हाला संघात दबावाचा सामना करावा लागला. त्यानंतर मी आणि अश्विनने संघाचे दडपण कमी केले आणि धावसंख्या 190 पर्यंत आणली.

तसेच कार्तिकने टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी किती उत्सुक आहे, हेही सूचित केले. तो म्हणाला की, आम्हाला संघासाठी विश्वचषक खेळायचा आहे. टी-20 विश्वचषक ( T-20 World Cup 2022 ) जिंकणे हे अंतिम ध्येय आहे.

हेही वाचा - India Beat West Indies : भारताचा वेस्ट इंडिजवर मोठा विजय, रोहित शर्माची धमाकेदार खेळी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.