ETV Bharat / sports

IND vs WI Series : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; शिखर धवन सांभाळणार नेतृत्वाची धुरा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. शिखर धवनला कर्णधार ( Captain Shikhar Dhawan ), तर रवींद्र जडेजाला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

शिखर धवन
Shikhar Dhawan
author img

By

Published : Jul 6, 2022, 4:55 PM IST

Updated : Jul 6, 2022, 5:38 PM IST

नवी दिल्ली : भारतीय संघ लवकरच वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी ( India's tour of the West Indies ) रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली ( Indian squad announced ODI series against WI ) आहे. या दौऱ्यासाठी शिखर धवनला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे, तर उपकर्णधार पदाची जबाबदारी रवींद्र जडेजाकडे ( Vice-captain Ravindra Jadeja ) सोपवण्यात आली आहे.

इंग्लंडमध्ये होणार्‍या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारताला वेस्ट इंडिजचा दौरा ( India tour to West Indies ) करायचा आहे, जिथे तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. बीसीसीआयने बुधवारी टीम इंडियाची घोषणा केली. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती ( Rest to senior players ) देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या जागी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

  • 🚨 NEWS 🚨: The All-India Senior Selection Committee has picked the squad for the three-match ODI series against the West Indies to be played at the Queen's Park Oval, Port of Spain, Trinidad.#TeamIndia | #WIvIND

    — BCCI (@BCCI) July 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वनडे संघात अनेक खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. ज्यामध्ये संजू सॅमसन, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज या खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. या मालिकेत इशान किशन, शुभमन गिल यांनाही संधी देण्यात आली आहे. परंतु यामध्ये आयपीएल स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या राहुल त्रिपाठीला वगळण्यात आले आहे. तसेच सतत अपयशी ठरणाऱ्या ऋतुराज गायकवाडवर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आला.

  • #TeamIndia ODI squad:
    Shikhar Dhawan (C), Ravindra Jadeja (VC), Ruturaj Gaikwad, Shubman Gill, Deepak Hooda, Suryakumar Yadav, Shreyas Iyer, Ishan Kishan (WK), Sanju Samson (WK), Shardul Thakur, Yuzvendra Chahal, Axar Patel, Avesh Khan, Prasidh Krishna, Mohd Siraj, Arshdeep Singh

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:

शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.

भारताचा वेस्ट इंडिज दौरा :

वनडे मालिकेचे वेळापत्रक -

पहिला एकदिवसीय - 22 जुलै संध्याकाळी 7 वाजता

दुसरी वनडे - 24 जुलै संध्याकाळी 7 वाजता

तिसरी एकदिवसीय - 27 जुलै, संध्याकाळी 7 वाजता

टी-20 मालिकेचे वेळापत्रक -

पहिला T20 - 29 जुलै

दुसरा T20 - 1 ऑगस्ट

तिसरा T20 - 2 ऑगस्ट

चौथी T20 - 6 ऑगस्ट

पाचवा T20 - 7 ऑगस्ट

सध्या फक्त एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे, तर टी-20 मालिकेची घोषणा लवकरच करण्यात येईल. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. कारण टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी ही अत्यंत महत्त्वाची मालिका आहे.

हेही वाचा - Ind Vs Eng Test Series : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताला दुसरा झटका, 'या' कारणासाठी ठोठावला दंड

Last Updated : Jul 6, 2022, 5:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.