ETV Bharat / sports

Deepti Sharma Record : कौतुकास्पद ! आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये दीप्ती शर्माने रचला इतिहास, 100 विकेट घेणारी पहिली भारतीय क्रिकेटर

महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये, भारतीय संघाने केपटाऊनमधील न्यूलँड्स मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा सामना जिंकला आहे. भारताने वेस्ट इंडिजवर 11 चेंडू राखून 6 विकेट्स राखून विजय मिळवला. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक ३ बळी घेतले. यासह दीप्तीने टी-20 फॉरमॅटमध्ये 100 विकेट पूर्ण केल्या आहेत.

Deepti Sharma Record
आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 100 विकेट
author img

By

Published : Feb 16, 2023, 7:31 AM IST

नवी दिल्ली : महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा सामना जिंकला आहे. 11 चेंडू बाकी असताना 6 विकेटने त्यांनी हा सामना जिंकला. त्यामुळे भारतीय संघ ब गटात अव्वल स्थानावर कायम आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर हा सामना खेळवला गेला. भारताची फिरकीपटू दीप्ती शर्माने वेस्ट इंडिजविरुद्ध अविश्वसनीय खेळी केली. तिने तीन विकेट घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तिच्या या दमदार कामगिरीमुळे दीप्ती शर्माला सामनावीर घोषित करण्यात आले. दीप्ती शर्माने सामन्यात 4 षटकात 15 धावा देत 3 बळी घेतले. या दरम्यान दीप्ती शर्माचा इकॉनॉमी रेट 3.75 होता. सामन्यात त दीप्ती शर्माने 12 डॉट बॉल टाकले.

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 100 विकेट : वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 118 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 18 षटकांत 4 गडी गमावून 119 धावा करत सामना 6 विकेटने जिंकला. यासह दीप्ती शर्माने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 100 विकेट पूर्ण केल्या आहेत. T20 फॉरमॅटमध्ये 100 विकेट घेणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तिने 98 बळी घेणाऱ्या पूनम यादवला मागे टाकले आहे. दीप्ती शर्माने एफी फ्लेचरच्या गोलंदाजीवर तिच्या विकेटचे शतक पूर्ण केले. या विकेटसह तिने आयसीसी रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. दीप्तीने 89 सामने खेळले आणि 19.07 च्या सरासरीने 100 बळी पूर्ण केले.

सर्वोच्च कामगिरी : दीप्तीने 2016 मध्ये भारतासाठी टी-20 पदार्पण केले होते. दीप्तीने पहिल्याच सामन्यात 4 षटकात 19 धावा देत एक विकेट घेतली होती. 10 धावांत 4 बळी ही दीप्तीची आत्तापर्यंतची सर्वोच्च कामगिरी आहे. त्याचबरोबर दीप्ती शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 विकेट घेणारी पहिली भारतीय क्रिकेटर बनली आहे. पुरुष क्रिकेट संघातही असा पराक्रम एकाही खेळाडूला करता आलेला नाही. फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलच्या नावावर 91 तर भुवनेश्वर कुमारच्या नावावर देखील 91 बळी आहेत. सर्वाधिक 125 विकेट घेण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या अनिसा मोहम्मदच्या नावावर आहे.

भारतीय संघाकडून : एस मंधाना, शफाली वर्मा, जी रॉड्रिग्स, एच कौर, आर.एम. घोष, डी.बी. शर्मा, पी वस्त्राकर, डी.पी. वैद्य, आर.पी. यादव, आर.एस. गायकवाड, आर.एस. ठाकूर खेळत आहेत. वेस्ट इंडिज संघाकडून : एच.के. मॅथ्यूज, एस.आर. टेलर, एस.ए. कॅम्पबेल, आर.एस. विल्यम्स, एस गजनाबी, सीए हेन्री, सी.एन नेशन, ए.एस. फ्लेचर, एस.सी. सेलमन, एस.एस. कोनेल, के रामहारक खेळत आहेत.

हेही वाचा : ICC Women T20 World Cup: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला टी २०; भारताचा वेस्ट इंडिजवर विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.