हैदराबाद David Warner Dean Elgar : ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आणि दक्षिण आफ्रिकेचा डीन एल्गर या दोन फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीनं जगभरातील गोलंदाजांच्या मनात धडकी भरवली आहे. हे दोन्ही डावखुरे सलामीवीर उद्या (३ जानेवारी) आपला शेवटचा कसोटी सामना खेळतील. त्यांनी आधीच याबाबतची घोषणा केली होती.
दोघांची कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी : डेव्हिड वॉर्नर सिडनीमध्ये पाकिस्तानविरुद्ध आपला अखेरचा कसोटी सामना खेळेल. तर एल्गर बुधवारपासून केपटाऊनमध्ये भारताविरुद्ध खेळताना दिसणार आहे. या दोन्ही खेळाडूंनी कसोटी फॉरमॅटमध्ये आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली असून, दोघांचे आकडे खूप चांगले आहेत.
डेव्हिड वॉर्नर : ऑस्ट्रेलियाचा डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. जगभरातील भल्या-भल्या गोलंदाजाची लाईन आणि लेन्थ कशी खराब करायची हे त्याला चांगलंच ठावूक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये वॉर्नरची आकडेवारी उत्कृष्ट आहे. त्यानं 111 कसोटी सामन्यांच्या 203 डावांमध्ये 8695 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 44.59 एवढी राहिली. 335 ही त्यांची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. कसोटी क्रिकेटमध्ये वॉर्नरच्या नावावर 26 शतकं आणि 36 अर्धशतकं असून, या दरम्यान त्यानं 2 द्विशतकंही ठोकली आहेत.
-
David Warner in Test cricket:
— Johns. (@CricCrazyJohns) January 2, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Matches - 111
Runs - 8695
Average - 44.59
Hundreds - 26
Fifties - 36
One of the icons of Australian cricket will retire from ODIs & Tests this week. ⭐👑 pic.twitter.com/AGIPI9fx1o
">David Warner in Test cricket:
— Johns. (@CricCrazyJohns) January 2, 2024
Matches - 111
Runs - 8695
Average - 44.59
Hundreds - 26
Fifties - 36
One of the icons of Australian cricket will retire from ODIs & Tests this week. ⭐👑 pic.twitter.com/AGIPI9fx1oDavid Warner in Test cricket:
— Johns. (@CricCrazyJohns) January 2, 2024
Matches - 111
Runs - 8695
Average - 44.59
Hundreds - 26
Fifties - 36
One of the icons of Australian cricket will retire from ODIs & Tests this week. ⭐👑 pic.twitter.com/AGIPI9fx1o
डीन एल्गर : डावखुरा सलामीवीर फलंदाज डीन एल्गरनं 85 कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं. एल्गर त्याच्या उत्कृष्ट फलंदाजी तंत्रासाठी ओळखला जातो. एल्गरची फलंदाजीची शैली कसोटीसाठी योग्य आहे. एल्गरची आकडेवारी सुद्धा हेच दर्शवते. एल्गरनं 85 कसोटी सामन्यांच्या 150 डावात फलंदाजी करताना एकूण 5331 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 14 शतकं आणि 23 अर्धशतकं आहेत. 199 ही त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. भारताविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीत एल्गरनं 185 धावांची इनिंग खेळली होती.
-
8️⃣4️⃣ Test Matches
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
5️⃣1️⃣4️⃣6️⃣ Runs
2️⃣3️⃣ Fifties
1️⃣3️⃣ Tons
Dean Elgar's last dance gets underway as he steps to the crease at SuperSport Park 🇿🇦#ThankYouDean #WozaNawe#BePartOfIt pic.twitter.com/m3FQNj4K9v
">8️⃣4️⃣ Test Matches
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 27, 2023
5️⃣1️⃣4️⃣6️⃣ Runs
2️⃣3️⃣ Fifties
1️⃣3️⃣ Tons
Dean Elgar's last dance gets underway as he steps to the crease at SuperSport Park 🇿🇦#ThankYouDean #WozaNawe#BePartOfIt pic.twitter.com/m3FQNj4K9v8️⃣4️⃣ Test Matches
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 27, 2023
5️⃣1️⃣4️⃣6️⃣ Runs
2️⃣3️⃣ Fifties
1️⃣3️⃣ Tons
Dean Elgar's last dance gets underway as he steps to the crease at SuperSport Park 🇿🇦#ThankYouDean #WozaNawe#BePartOfIt pic.twitter.com/m3FQNj4K9v
-
Dean Elgar registered his second-highest score in Test cricket and the highest against India 🔥#WTC25 | #SAvIND pic.twitter.com/h5No6LUhki
— ICC (@ICC) December 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Dean Elgar registered his second-highest score in Test cricket and the highest against India 🔥#WTC25 | #SAvIND pic.twitter.com/h5No6LUhki
— ICC (@ICC) December 28, 2023Dean Elgar registered his second-highest score in Test cricket and the highest against India 🔥#WTC25 | #SAvIND pic.twitter.com/h5No6LUhki
— ICC (@ICC) December 28, 2023
हे वाचलंत का :
- क्रिकेट चाहत्यांना यंदा टी-२० वर्ल्डकपची मेजवानी, 'या' महिन्यात रंगणार आयपीएलचा थरार; जाणून घ्या टीम इंडियाचं वर्षभराचं वेळापत्रक
- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलिया क्रिकेटला मोठा धक्का; 'या' दिग्गज खेळाडूनं वनडे क्रिकेटलाही केलं 'अलविदा'
- गौतम गंभीरची मोठी भविष्यवाणी; 'हा' संघ टी २० विश्वचषकात भारतासाठी धोका असल्याचं म्हणाला