हैदराबाद - गेल्या कित्येक दिवसांपासून क्रिकेट विश्वाला वेध लागलेल्या आयपीएलच्या 15 व्या ( IPL 2022 ) हंगामाचे बिगुल आजपासून वाजणार आहे. गजविजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स ( CSK VS KKR ) यांच्यात पहिली लढत पार पडणार आहे. यंदाच्या हंगामात 10 संघामध्ये आयपीएलचा थरार पहायला मिळाणार आहे.
भारताचा प्रसिद्ध खेळाडू महेंद्र सिंह धोनीने आयपीएल सुरु होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे धोनीच्या सर्व चाहत्यांना एकच धक्का बसला होता. त्याने कर्णधार पदाची ही जबाबदारी आपला खास भिडू रविंद्र जडेजाकडे सोपावली आहे. तर, कोलकाता संघाची धुरा श्रेयश अय्यरकडे आहे.
या दोन खेळाडूंच्या अनुपस्थित पार पडणार सामना - कोलकाता आणि चेन्नई यांच्या पार पडणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघातील प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती जाणवणार आहे. वेगवान गोलंदाज दिपक चाहर हा दुखापतीमुळे ग्रस्त आहे. तर, चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली हा व्हिसा उशीरा मिळाल्यामुळे संघाशी उशीला जोडला गेला आहे.
असा असु शकेल चेन्नईचा प्लेइंग इलेव्हन संघ - अंबाती रायडू, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉन्वे, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), एडम मिल्ने, माहीश तीक्षाणा, ड्वेन ब्रावो, तुषार देशपांडे, केएल आसिफ.
कोलकाताचा प्लेइंग इलेव्हन संघ असा असेल - वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), अनुकूल रॉय, आंद्रे रसल, सुनील नरेन, शिवम मावी, वरूण चक्रवर्ती, टिम साउदी.
कुठे, किती वाजता असेल सामना - चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे हा सामना पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.00 वाजता नाणेफेक होईल. तर, 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
हेही वाचा - IPL 2022 Updates: गुजरात टायटन्स संघाने लाँच केले आपले 'आवा दे' एंथम साँग