ETV Bharat / sports

Cricket World Cup : एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना 'विराट'च सर्वोत्तम; वाचा आकडेवारी काय सांगते? - विश्वचषक विजेता कर्णधार रिकी पाँटिंग

Cricket World Cup : ५० षटकांच्या सामन्यांत धावांचा पाठलाग करताना आपणच सर्वोत्तम फलंदाज असल्याचं विराटनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय. कालच्या सामन्यात विराट कोहलीनं आपलं कौशल्य दाखवत ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रिकेट विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात संघ 2-3 असा अडचणीत असताना 200 धावांचा पाठलाग करताना 116 चेंडूत 85 धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावलीय.

Cricket World Cup
Cricket World Cup
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2023, 11:09 AM IST

हैदराबाद Cricket World Cup : 2011 च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचा एक भाग असलेल्या दिल्लीच्या विराट कोहलीनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करणारा 'चेस मास्टर' अशी ख्याती मिळवलीय. कालच्या सामन्यातही विराट कोहलीनं आपलं कौशल्य दाखवत ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रिकेट विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात संघ 2-3 असा अडचणीत असताना 85 धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावत आपण 'चेस मास्टर' असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलंय.

पाकिस्तान विरुद्धही अशीच खेळी : विराट कोहली आणि के.एल. राहुलच्या झुंजार खेळीमुळे भारतानं चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पाचवेळचा चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियाला हरवून यंदाच्या विश्वचषकात विजयी सुरुवात केली. ऑक्‍टोबर 2022 मध्येही टी-20 विश्वचषकादरम्यान ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी खेळत होता, त्यावेळीदेखील विराट कोहलीनं खेळीनं भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

कोहलीच सर्वोत्तम 'चेस मास्टर' : विराट कोहलीनं एकदिवसीय सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना 148 डावांमध्ये 64.31 च्या सरासरीनं आणि 93.50 च्या स्ट्राइक रेटसह 28 शतकं आणि 38 अर्धशतकांसह तब्बल 7,525 धावा केल्या आहेत. यात त्याची 183 च्या सर्वोच्च धावसंख्या आहे. धावांचा पाठलाग करताना विजयी झालेल्या सामन्यांमध्ये कोहलीनं 92 डावांमध्ये 88.98 च्या सरासरीनं आणि 97.1 च्या स्ट्राइक रेटसह 5,517 धावा केल्या आहेत. यात 22 शतकं आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. अशाप्रकारे एकदिवसीय सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत.

सचिन तेंडूलकर दुसऱ्या क्रमांकावर : या यादीत दुसऱ्या क्रमांकावर क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर विराजमान आहे. त्यानं धावांचा पाठलाग करताना 124 डावांमध्ये 55.45 च्या सरासरीनं 5,490 धावा केल्या आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी विश्वचषक विजेता कर्णधार रिकी पाँटिंगची क्रमांक येतो. त्यानं धावांचा पाठलाग करताना 104 डावांमध्ये 57.34 च्या सरासरीनं 4186 धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा आधुनिक काळातील आणखी एक सर्वोत्तम खेळाडू आहे. त्यानं धावांचा पाठलाग करताना 89 डावांत 63.22 च्या सरासरीनं 3,983 धावा करत चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवलंय. तर या यादीत पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस आहे, त्यानं धावांचा पाठलाग करताना 100 डावांत 3950 धावा केल्या आहेत.

हेही वाचा :

  1. World Cup २०२३ IND vs AUS : कोहलीला मिळालेलं 'जीवदान' भारतासाठी ठरलं 'वरदान'; पहिल्याच सामन्यात मोडले 'हे' विक्रम
  2. Cricket World Cup २०२३ : टीम इंडियाची रणनीती यशस्वी, भारतीय फिरकी त्रिकुटासमोर कांगारूंनी टेकले गुडघे
  3. Cricket World Cup २०२३ : वर्ल्डकपमध्ये डेव्हिड वॉर्नरचा विश्वविक्रम, सचिन, डिव्हिलियर्सला मागं टाकलं

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.