ETV Bharat / sports

Cricket World Cup Kane Williamson available : केन विल्यमसन बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज

Cricket World Cup Kane Williamson available : क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यांचा रंग आता चढत चालला आहे. दुखापत किंवा इतर कारणानं काही खेळाडू बाहेर जात आहेत, तर काही आत येत आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन दोन सामने खेळू शकला नव्हता. आता शुक्रवारी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी मात्र तो सज्ज आहे.

Kane Williamson
Kane Williamson
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2023, 3:32 PM IST

Updated : Oct 12, 2023, 4:12 PM IST

चेन्नई (तामिळनाडू) Cricket World Cup Kane Williamson available : क्रिकेट विश्वचषकातील पहिले दोन सामने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्स खेळू शकला नाही. मात्र शुक्रवारी येथे खेळल्या जाणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या साखळी सामन्यासाठी आता तो सज्ज झाला आहे. विल्यमसन दुखापतग्रस्त झाल्यानं तो गतविजेत्या इंग्लंड (अहमदाबादमध्ये) आणि नेदरलँड्स (हैदराबादमध्ये) विरुद्धचे पहिले दोन सामने खेळू शकला नाही. त्याच्या जागी टॉम लॅथम हा किवींच्या संघाचा कर्णधार म्हणून उभा राहिला. आतापर्यंत स्पर्धेत अपराजित राहिलेल्या न्यूझीलंडसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे, त्यांचा वरिष्ठ वेगवान गोलंदाज टीम साऊथी आता बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. विल्यमसनप्रमाणेच टीम साऊदीनंही हे सामने मुकले होते. इंग्लंड आणि नेदरलँड्स विरुद्धचे सामने तो खेळू शकला नव्हता. आता हे दोन्ही खेळाडू तंदुस्त झाल्यानं किवींची बाजू मजबूत झाली आहे.

विल्यमसन किवींची बाजू भक्कम करणार - केन विल्यमसनला दुखापत झाल्यानं तो संघाबाहेर होता. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सांगितलं की केन विल्यमसन ACL फाटल्यानंतर आता शस्त्रक्रियेतून पुरेसा बरा झाला आहे. त्याचप्रमाणे साऊथीला त्याच्या अंगठ्यावरील दुखापतीतून आराम मिळाला आहे. मात्र तो अजूनही फिट नाही. तो खेळू शकणार नाही. न्यूझीलंडनं पहिले दोन सामने जिंकले आहेत. आता एमए चिदंबरम स्टेडियमवर त्यांची विजयी घोडदौड सुरू ठेवण्यास संघ उत्सुक आहे. हे स्टेडियम 'चेपॉक' या नावानं ओळखल जातं. यावेळी कर्णधार शकिब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या फिरकीपटूंचं आव्हान त्यांच्यासमोर आहे.

सामन्याआधीच्या औपचारिक पत्रकार परिषदेमध्ये विल्यमसननं आज आपण आपल्या दुखापतीतून बरं झाल्याचं म्हटलंय. या दुखापतीमधून बाहेर पडल्याचं त्यानं स्पष्ट केलं. तसंच आता पुढील सामन्यासाठी आपण उत्सुक असल्याचं विल्यमसननं स्पष्ट केलं. त्याचबरोबर टिम मात्र अजून फिट नसल्याचं त्यानं स्पष्ट केलं. त्यामुळे उद्याच्या सामन्यात तो खेळू शकणार नाही असंही त्यानं सांगितलं.

विल्यमसनचा अनुभव येणार कामी - अनुभवी असलेल्या केन विल्यमसनने 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचं नेतृत्व केलंय. त्यावेळी न्यूझीलंडला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. इंग्लंडकडून अंतिम लढतीत न्यूझीलंडला पराभव पत्करावा लागला होता. विल्यमसनने 161 एकदिवसीय सामन्यांमध्ये 6,554 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 13 शतके आणि 42 अर्धशतकांसह 148 धावा आहेत. त्याने 2010 मध्ये डंबुला येथे भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

बांग्लादेशची कसोटी - दुसरीकडे बांग्लादेशला धरमशाला येथे गतविजेत्या इंग्लंडने दिलेल्या धोबीपछाडला विसरावं लागेल. तेही आता विजय मिळवण्यासाठी उत्सुक असतील. पण बांग्लादेशसाठी हा विजय सोपा असणार नाही. किवींच्यासमोर त्यांचा टिकाव लागेल का ते पाहावं लागेल.

हेही वाचा...

  1. 45 Special Gayle : 'तो' रेकॉर्ड तोडताच 'युनिव्हर्स बॉस'नं 'हिटमॅन'चं केलं खास शैलित अभिनंदन
  2. ICC CWC 2023 India vs Pakistan : विश्वचषकातील महामुकाबल्यामुळे हॉटेल्स व्यावसायिकांची 'चांदी', हॉटेलमधील रुमच्या किमती गगनाला
  3. ICC CWC 2023 India vs Pakistan : भारत की पाकिस्तान? कोण जिंकणार 'हाय-व्होल्टेज' सामना? काय आहे आजपर्यंतचा इतिहास, वाचा...

Last Updated : Oct 12, 2023, 4:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.