ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : सलग दोन विश्वचषकात फायनलमध्ये पराभव, आता तरी न्यूझीलंडचा ट्रॉफीचा दुष्काळ संपणार का? - न्यूझीलंड क्रिकेट संघ

Cricket World Cup 2023 : सलग दोन वर्ल्डकप फायनलमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर, आता न्यूझीलंडचं लक्ष भारतात आयोजित विश्वचषकात त्यांचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याकडे असेल. चला तर मग एक नजर टाकूया काय आहेत न्यूझीलंड संघाची बलस्थाने आणि त्यांची कमजोरी...

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2023, 12:15 PM IST

हैदराबाद Cricket World Cup 2023 : गेल्या दोन विश्वचषकातील उपविजेता न्यूझीलंडचा संघ यावेळेस पुन्हा एकदा विजेतेपदाचा दावेदार असेल. हा संघ आयसीसी स्पर्धांमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करतो. मात्र अद्याप त्यांना जेतेपदानं हुलकावणी दिली आहे.

न्यूझीलंडची ताकद :

१. अनुभवी नेतृत्व आणि फलंदाजी - न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. दबावाच्या स्थितीत त्याचा अनुभव आणि शांत वागणूक संघाला नेहमीच उपयोगी पडते. आयपीएल २०२३ च्या पहिल्या सामन्यात झालेल्या दुखापतीनंतर त्यानं संघात पुनरागमन केलंय. त्याशिवाय विकेटकीपर फलंदाज टॉम लॅथम फिरकीपटूंविरुद्ध चांगला खेळतो. भारतीय भूमीवर खेळण्याचा त्याचा रेकॉर्डही चांगला आहे. लॅथमनं पदार्पणानंतर वनडेमध्ये भारतात सर्वाधिक धावा केल्या आहेत.

२. अष्टपैलू गोलंदाजी आक्रमण - न्यूझीलंडकडे ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी आणि लोकी फर्ग्युसन सारख्या अनुभवी वेगवान गोलंदाजांसह उत्कृष्ट गोलंदाजीसाठी आक्रमक गोलंदाज आहेत. वेगवेगळ्या परिस्थितीत चेंडू स्विंग आणि सीम करण्याची त्यांची क्षमता कोणत्याही फलंदाजाला त्रास देऊ शकते. याव्यतिरिक्त, संघात दर्जेदार फिरकीपटू आहेत. ईश सोढी आणि मिचेल सँटनर यांच्या गोलंदाजीत वैविध्य आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट डेथ ओव्हर्समध्ये त्याच्या वेगवान यॉर्कर्सनं कहर करतो. तर भारतीय परिस्थिती आणि खेळपट्ट्या ऐतिहासिकदृष्ट्या फिरकीपटूंना अनुकूल असल्यानं, लेगस्पिनर ईश सोढी संघासाठी महत्त्वाचा खेळाडू म्हणून उदयास येऊ शकतो.

न्यूझीलंडची कमजोरी :

१. मधल्या फळीची चिंता - न्यूझीलंडची आघाडीची फळी मजबूत असली तरी मधल्या फळीतील फलंदाजी चिंतेचा विषय आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा ग्लेन फिलिप्स वगळता न्यूझीलंडच्या मधल्या फळीकडे भारतीय परिस्थितीत खेळण्याचा फारसा अनुभव नाही. दबावाच्या परिस्थितीत, संघाला मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स आणि रचिन रवींद्र यांसारख्या खेळाडूंकडून सातत्यपूर्ण कामगिरीची आवश्यकता असेल, जेणेकरून लवकर विकेट पडल्यास मजबूत फिनिश किंवा रिकव्हरी होईल.

२. मर्यादित फिरकी पर्याय - सँटनर आणि सोढी हे अनुभवी फिरकीपटू असले तरी त्यांच्याशिवाय संघाकडे इतर फिरकीचे पर्याय नाहीत. या दोघांपैकी एकाला स्पर्धेदरम्यान दुखापत झाली तर संघ अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे या दोघांवर जास्त अवलंबून राहणं कमजोरी ठरू शकते.

न्यूझीलंड संघापुढील आव्हानं :

  • दुखापत - महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापत झाल्यास न्यूझीलंडच्या विश्वचषक जिंकण्याच्या शक्यतांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दुखापतींचा धोका कमी करण्यासाठी संघांला खेळाडूंच्या कार्यभाराचं प्रभावीपणे व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. कर्णधार केन विल्यमसन आधीच गुडघ्याच्या दुखापतीनं त्रस्त असून इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अंगठ्याला दुखापतं झाल्यानं टीम साऊदी मैदानाबाहेर आहे.

थोडक्यात, न्यूझीलंड संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचं उत्तम मिश्रण आहे. त्यांच्यासाठी मधल्या फळीची चिंता दूर करणं आणि संपूर्ण स्पर्धेत खेळाडूंचा फिटनेस सुनिश्चित करणं महत्त्वाचं ठरेल. हे करणं त्यांना जमलं तर त्यांच्यात विश्वचषकात आपला प्रभाव पाडण्याची क्षमता निश्चितच आहे.

हेही वाचा :

  1. Cricket world cup 2023 : ना धोनी, ना युवराज; कोणते आहेत वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे टॉप-५ फलंदाज
  2. Cricket World Cup 2023 : अश्विन-अक्षर चर्चेत संदीप पाटील यांची उडी, उपांत्य फेरीचंही केलं भाकित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.