ETV Bharat / sports

Cricket World Cup २०२३ : सर्वाधिक अर्धशतकं ठोकणारा फलंदाज ठरला शुभमन गिल

Cricket World Cup २०२३ : विश्वचषक २०२३ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिलने (Shubman Gill) आपले दुसरे अर्धशतक झळकावलंय. मात्र, या विश्वचषकात गिलला अपेक्षेप्रमाणे धावा करता आल्या नाहीत. इतकं होऊनही शुभमन गिल हा या वर्षात सर्वाधिक अर्धशतकं झळकावणारा खेळाडू ठरलाय.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 7:51 PM IST

मुंबई Cricket World Cup २०२३ : शुभमन गिलनं ((Shubman Gill)) २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ९२ धावांची खेळी केली. पन्नास धावा पूर्ण करताच त्यानं यावर्षी सर्वाधिक अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांना मागे सोडलंय. डेंग्यूने बाधित झाल्यामुळं शुभमन गिल विश्वचषक २०२३ च्या सुरुवातीच्या सामन्यात खेळू शकला नाही. मात्र, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिलनं 57 धावांची खेळी केली. त्यानंतर गुरुवारी शुभमन गिलनं श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक झळकावलं.

सुपरफास्ट शुभमन गिल : शुभमननं श्रीलंकेविरुद्ध सामन्यात 50 धावा करून श्रीलंकेच्या पथुम निसांकाला मागं टाकलंय. निसांकानं यावर्षी सर्वाधिक 11 अर्धशतकं झळकावली होती. या वर्षात शुभमन गिलनं 12 अर्धशतके झळकावली आहेत. पथुम निसांकानं 11 अर्धशतकं केली आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनेही यावर्षी 11 अर्धशतकं झळकावली आहेत, तर आता शुभमननं या वर्षात 12 अर्धशतकं ठोकत विक्रम केलाय.

विराट-रोहित जोरदार फॉर्ममध्ये : विराट कोहलीनंही यावर्षी १० अर्धशतके झळकावली आहेत. विश्वचषकात विराट कोहलीची बॅट जोरदार चालत आहे. बांगलादेशविरुद्धही त्यानं शतक झळकावलं होतं. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीनेही शानदार खेळी केली होती. भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही या वर्षात आतापर्यंत 10 अर्धशतकं ठोकली आहेत. याशिवाय या विश्वचषकात रोहित शर्मानेही अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

सर्वात लांब षटकार : भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केलाय. श्रीलंकेविरुद्ध शानदार फलंदाजी करताना त्याने ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला मागे टाकत ICC विश्वचषक 2023 मध्ये सर्वात लांब षटकार ठोकण्याचा विक्रम केलाय.

हेही वाचा -

  1. Virat Kohli ODI Record : 'विराट'चा नादखुळा; सचिन अन् संघकाराचा मोडला रेकॉर्ड
  2. Kohli fan at Wankhede : विराट कोहलीची बॅटिंग पाहायला वानखडेवर दिवान्यांची गर्दी
  3. Surendra Nayak Exclusive Interview : भारतीय संघासाठी रोहित शर्मा देवानं दिलेली देणगी - माजी क्रिकेटपटू सुरेंद्र नायक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.