ETV Bharat / sports

Shreyas Iyer Father Interview : श्रेयस अय्यरच्या वडिलांसोबत 'ईटीव्ही भारत'चा 'वन टू वन'; सांगितली अनेक गुपितं - मुंबईतील वानखेडे स्टेडियम

Shreyas Iyer Father Interview : उजव्या हाताच्या फलंदाजाला खेळताना शॉर्ट बॉलचा सामना करावा लागतो, असा दावा केला जाता होता. मात्र, भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरनं या दाव्याचं पत्रकार परिषदेत खंडन केलं होतं. त्यानंतर त्याचे वडील संतोष अय्यर यांनीही त्यांचं मत 'ETV भारत'शी संवाद साधताना स्पष्ट केलंय.

ETV BHARAT EXCLUSIVE
ETV BHARAT EXCLUSIVE
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 5:25 PM IST

हैदराबाद Shreyas Iyer Father Interview : 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतानं आतापर्यंतचे सर्व सामने जिंकून दमदार कामगिरी केली आहे. भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरनं 7 डावात 43.20 च्या सरासरीनं 216 धावा करत संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, उजव्या हाताच्या फलंदाजाला खेळताना शॉर्ट बॉलचा सामना करावा लागतो, असे दावे क्रिकेट विश्वात केले जात होते. परंतु, अलीकडेच एका पत्रकार परिषदेत श्रेयस अय्यरनं या दाव्यांचं खंडन केलंय. श्रेयसचे वडील संतोष अय्यर यांनीही याबाबत त्यांच मत 'ETV भारत'शी बोलताना स्पष्ट केलंय. ते म्हणाले की, शॉर्ट बॉलचा सामना करणं कठीण असल्याच्या सर्व चर्चा खोट्या आहेत.

शॉर्ट बॉल्सबाबत सर्व अफवा : संतोष अय्यर यांनी 'ईटीव्ही भारत'शी खास संवाद साधताना सांगितलं की, श्रेयस अय्यरला खेळताना शॉर्ट बॉल्सचा सामना करावा लागतो, या सगळ्या अफवा आहेत. श्रेयस चांगला खेळाडू आहे. प्रत्येक खेळाडूबाबत काही सकारात्मक, नकारात्मक गोष्टी असतात. मात्र, त्यावर मात करत आपण आपला संघर्ष कायम सुरू ठेवायला पाहिजे.

मोठी खेळी खेळण्यात अपयशी : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात श्रेयसनं 82 धावांची शानदार खेळी केली होती. त्यामुळं संघाला सामन्यात 300 धावांचा टप्पा पार करता आला होता. मात्र, अय्यर गेल्या तीन सामन्यांमध्ये 19, 33, 4 धावा करत मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला होता. त्याच्या खेळीबद्दल विचार करताना संतोष अय्यर म्हणाले की, श्रेयसनं विश्वचषकात चांगली कामगिरी करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळं तो भारतीय संघासाठी उत्तम कामगिरी करेल.

श्रेयसची महत्त्वाची भूमिका : श्रीलंकेविरुद्धचा सामना भारतासाठी खूप छान होता. संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात श्रेयसच्या खेळीनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. पहिल्या काही सामन्यांमध्ये कमी धावा केल्यानंतर त्याला जास्त धावा करण्यात अपयश आलं आहे. मात्र, याबाबत त्याचे वडील म्हणाले की, बाहेर प्रेक्षकांचा आवाज तसंच प्रसारमाध्यमांमुळं त्याच्यावर काही प्रमाणात प्रभाव पडला. मात्र, त्यानं खचून न जाता त्यावर मात करण्याचा निर्धार केलाय.

श्रेयस दुखापतीमुळं खेळापासून दूर : दुखापतीनंतर श्रेयस बराच काळ खेळापासून दूर होता. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्यानं पुन्हा पुनरागमन केलं. अय्यर यांच्या कुटुंबानं देखील श्रेयशला प्रेरित केलं. तसंच डॉक्टरांनी त्याला शक्य तितक्या लवकर बरे होण्यास मदत केली. श्रेयस दुखापतीमुळं बराच काळ खेळापासून दूर असल्यामुळं तो वाईट टप्प्यातून गेला होता. परंतु, वाढत्या कामाचा ताण, दुखापती हा खेळाचा अविभाज्य भाग आहे. आम्ही त्याला कठीण प्रसंगांवर मात करण्यासाठी मदत केली. त्याला पुनरागमनासाठी पाठिंबा दिल्याबद्दल निवडकर्त्यांचं तसंच भारतीय संघ व्यवस्थापनाचेही संतोष अय्यर यांनी आभार मानले.

हेही वाचा -

  1. Virat Kohli 35th Birthday : कोहलीला वाढदिवशी आज मिळणार सोन्याचा मुलामा असलेली बॅट, 'विराट' कामगिरीनं आजवर नोंदविले अनेक विक्रम
  2. Cricket World Cup 2023 IND vs SA : विश्वचषकातील दोन बलाढ्य संघांमध्ये वर्चस्वाची लढाई; ईडन गार्डन्सवर होणार 'हाय व्होल्टेज' सामना
  3. Mohammed Shami : वडीलच होते पहिले प्रशिक्षक, शेतामध्ये शिकला स्विंग बॉलिंग; जाणून घ्या शमीचा आतापर्यंतचा प्रवास

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.