चेन्नई Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषक 2023 चा थरार सध्या जगभरात सुरू आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन दिग्गज संघात झालेल्या सामन्यात भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया संघाला धूळ चारली आहे. मात्र भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान झालेल्या सामन्यात आपल्या गोंधळासाठी कुप्रसिद्ध असलेल्या डॅनियल जार्विस उर्फ जार्वोनं एन्ट्री केली होती. यावेळी तो के एल राहुलला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करताना दिसला. त्यामुळं के एल राहुल त्याला मैदानाबाहरे जाण्याचा इशारा करताना दिसला. मात्र विराट कोहलीनं यामध्ये हस्तक्षेप केल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. तसंच विराट कोहलीनं माझ्या कामाचं कौतुक केल्याचा दावा जार्वोनं केला आहे.
-
Jarvo 69 Making his long-awaited Cricket World Cup debut for India! #jarvo69 #jarvo pic.twitter.com/8TXFr3Z8OH
— Jarvo69 (Daniel Jarvis) (@BMWjarvo) October 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Jarvo 69 Making his long-awaited Cricket World Cup debut for India! #jarvo69 #jarvo pic.twitter.com/8TXFr3Z8OH
— Jarvo69 (Daniel Jarvis) (@BMWjarvo) October 9, 2023Jarvo 69 Making his long-awaited Cricket World Cup debut for India! #jarvo69 #jarvo pic.twitter.com/8TXFr3Z8OH
— Jarvo69 (Daniel Jarvis) (@BMWjarvo) October 9, 2023
जार्वो 69 ची चेपॉकवर एन्ट्री : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघाच्या विश्वचषकातील सामन्यावर जगभरातील क्रीडा रसिकांचं लक्ष लागून होतं. मात्र या संघाच्या सामन्यादरम्यान कुप्रसिद्ध जार्वो 69 यानं सुरक्षा तोडून मैदानात एन्ट्री केली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली. जार्वोनं आपल्या मैदानात आक्रमण केल्यानंतरचा व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे. यात त्यानं भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीनं आपल्याला मदत केल्याचा दावा केला आहे. विराट कोहलीनं आपल्या कामाचं कौतुक केल्याचंही जार्वोनं म्हटलं आहे.
सुरक्षा भेदल्यानं मैदानात गोंधळ : जार्वो 69 नं सुरक्षा व्यवस्था भेदून चेपॉक मैदानात एन्ट्री केल्यानं सुरक्षा रक्षकांचा चांगालाच गोंधळ उडाला. यावेळी विराट कोहलीनंही जार्वो 69 कडं धाव घेत त्याला मैदानाबाहेर जाण्याचा इशारा केला. मात्र विराट कोहलीनं आपल्याला मदत केल्याचा दावा जार्वो 69 नं केला आहे.
जार्वो मैदानात घुसल्यानं के एल राहुल संतापला : मोहम्मद सिराज मैदानात क्षेत्ररक्षणासाठी जाताना जार्वोनं त्याचं जॅकेट काढून फेकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सिराज गोंधळल्यानं सुरक्षा रक्षकानं मैदानात धाव घेतली. जार्वो 69 हा मैदानात घुसल्यानं धढाडीचा फलंदाज के एल राहुल चांगलाच संतापला. त्यानं रागातच जार्वोला मैदानाबाहर जाण्याचा इशारा केला. त्यामुळेमैदानात आलेल्या सुरक्षा रक्षकांनी जार्वोला मैदानाबाहेर काढलं.
आयसीसीनं घातली जार्वोवर बंदी : जार्वोनं सुरक्षा भेदून मैदानात घुसल्याचं प्रकरण आयसीसीनं गंभीरपणे घेतलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) जार्वोवर विश्वचषक स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांमध्ये त्याच्या उपस्थितीवर बंदी घातली आहे. 'क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूची सुरक्षा हे आमचं प्राधान्य आहे. झालेला प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी काही अतिरिक्त सुरक्षा उपायांची आवश्यकता असल्यास विचार करण्यात येईल. जार्वोला इतर सामन्यात उपस्थित राहण्यावर बंदी घालण्यात आली आहे', असं आयसीसीनं जाहीर केलं आहे.
हेही वाचा :