ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यासाठी 14 हजार तिकीटं जारी

Cricket World Cup 2023 IND vs PAK : प्रत्येकजण भारत -पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक 2023 सामन्याची वाट पाहत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 14 ऑक्टोबरला दोन्ही संघ भिडतील. प्रत्येकाला स्टेडियममध्ये जाऊन हा सामना पाहायचा आहे. भारतामध्ये तब्बल 11 वर्षांनंतर दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय सामना होणार आहे.

Cricket World Cup 2023 IND vs PAK
Cricket World Cup 2023 IND vs PAK
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 7:21 AM IST

Updated : Oct 8, 2023, 2:24 PM IST

अहमदाबाद (गुजरात) Cricket World Cup 2023 IND vs PAK : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) शनिवारी 14 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदाबाद इथं होणाऱ्या बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी 14 हजार तिकिटं जारी करणार आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्याची तिकटं खरेदी करण्यासाठी चाहते प्रतिक्षा करत आहेत.

भारत विरुद्ध पाकिस्तान : हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे, जे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. त्याची आसन क्षमता 1 लाख 32 हजार एव्हढी आहे. दोन देशांमधील राजकीय, राजनैतिक संबंधांमुळं भारत-पाकिस्तानचे क्रिकेट संघ फक्त आयसीसी, आशियाई क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात.

8 ऑक्टोबर रोजी तिकिटांची विक्री होणार : बीसीसीआयनं एका मीडिया रिलीझमध्ये म्हटले आहे की, 'सामन्याच्या तिकिटांची विक्री 8 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. https://tickets.cricketworldcup.com अधिकृत तिकीट वेबसाइटवर चाहते तिकिटं खरेदी करू शकतात.

पाकिस्तान संघ 7 वर्षांनंतर भारतात दाखल : सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकासाठी बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ 7 वर्षांनंतर भारतात दाखल झाला आहे. पाकिस्ताननं हैदराबादमध्ये सराव सामना खेळलाय. त्याच मैदानावर नेदरलँड्सचा पराभव करुन आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : दुसरीकडं, भारत 8 ऑक्टोबर (आज) रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पाच वेळा चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. एकदिवसीय विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विक्रम उत्कृष्ट राहिला आहे. जेव्हाही दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत, तेव्हा भारतानं पाकिस्तानला सात वेळा पराभूत केलंय. 2011 च्या भारतात झालेल्या विश्वचषक सामन्यात दोन्ही संघ शेवटच्या वेळी आमनेसामने आले होते. मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर उभय संघांमध्ये झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यानंतर अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करुन भारतीय संघ दुसऱ्यांदा विश्वविजेता ठरला.

हेही वाचा -

  1. Cricket World Cup 2023 : भारतात आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव विश्वचषकासाठी उपयुक्त ठरेल - पॅट कमिन्स
  2. Cricket World Cup 2023 : शुभमन गिलबाबत कर्णधार रोहित शर्माचं 'मोठं' वक्तव्य
  3. Neeraj Chopra Interview : 'ईटीव्ही भारत'वर नीरज चोप्रा Exclusive; म्हणाला, एकदा जिंकलेली सर्व पदकं...

Last Updated : Oct 8, 2023, 2:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.