ETV Bharat / sports

Cricket World Cup २०२३ : श्रीलंकेच्या 'या' पाच प्रमुख खेळाडूंवर राहणार विशेष नजर; कामगिरीत आहेत अव्वल

Cricket World Cup २०२३ : क्वालिफायर जिंकून श्रीलंकेच्या संघानं विश्वचषक स्पर्धेत प्रवेश केलाय. श्रीलंकेच्या दमदार खेळीमुळं त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. कर्णधार दासुन शनाका व्यतिरिक्त, श्रीलंकेच्या आणखी चार खेळाडू श्रीलंकन संघासाठी चांगली कामगिरी करण्याच्या तयारीत आहेत. श्रीलंकेचा 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध समाना होणार आहे.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 5:39 PM IST

Updated : Oct 1, 2023, 7:29 PM IST

हैदराबाद : Cricket World Cup २०२३ : ICC ODI विश्वचषक 2023 मध्ये सहभागी होणारा श्रीलंकेचा संघ आशियातील अशा संघांपैकी एक आहे, जो भारतीय खेळपट्ट्यांचा पुरेपूर फायदा घेऊ शकतो. श्रीलंकेचे फिरकी गोलंदाज भारतीय पीचवर प्रभावी ठरू शकतात. इंडियन प्रीमियर लीगमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंनी भारतीय पीचवर चांगली कामगिरी केलीय. अशा परिस्थितीत त्यांना मोठ्या संघांना कडवी टक्कर देण्याची संधी असेल. चला तर मग जाणून घेऊया पाच प्रमुख खेळाडूंबद्दल.

  • महेश थेक्षाना : श्रीलंकेचा ऑफस्पिनर महेश थेक्षाना हा महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. तीक्षाना कोणत्याही जागतिक दर्जाच्या फलंदाजाला घाम फोडू शकतो. त्याच्या घातक गोलंदाजीसमोर मोठं मोठे फलंदाज नतमस्तक झाले आहेत. फक्त त्याच्या गोंलदाजीचा जुन्या खेळाडूंवर फारसा प्रभाव पडण्याची शक्यात दिसत नाही. नविन फलंदाजांना त्याच्या गोलंदाजीचा फारसा अनुभव नसल्यामुळं त्यांना थेक्षानाचा समाना करावा लागणार आहे. थेक्षानाला भारतीय खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यानं माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. महेश थेक्षानं आतापर्यंत 27 एकदिवसीय सामन्यात 44 बळी घेतले आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 4.50 आहे.
  • माथिशा पाथिराना : श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना संघासाठी महत्त्वाचा गोलंदाज ठरू शकतो. पाथिरानाचे चेंडू लसिथ मलिंगासारखे वेगवान असतात. मोठे फलंदाज त्याच्या गोलंदाजीपुढं गुडघे टेकतात. पाथिरानाला भारतीय खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करण्याचा खूप अनुभव आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना त्यानं सर्व जागतिक दर्जाच्या फलंदाजांना आपल्या वेगवान गोलंदाजीनं हैराण केलं होतं. पाथीरानानं 10 वनडेमध्ये 6.6 च्या इकॉनॉमीनं धावा देत 15 विकेट घेतल्या आहेत.
  • कुसल मेंडिस : श्रीलंकेच्या संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज कुसल मेंडिसनं आशिया कपमध्ये आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. मेंडिस त्याच्या दीर्घ खेळीसाठी ओळखला जातो. त्याच्यासमोर विरोधी गोलंदाजांना घाम येतो. तो संघासाठी शानदार फलंदाजी करत आहे. आतापर्यंत त्यानं 112 एकदिवसीय सामन्यांमध्ये 32.15 च्या सरासरीनं आणि 84.44 च्या स्ट्राइक रेटनं 3 हजार 215 धावा केल्या आहेत.
  • धनंजया डी सिल्वा : श्रीलंकेचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू धनंजया डी सिल्वा गोलंदाजीसह फलंदाजीनंसुध्दा कहर करताना दिसतो. धनंजया डी सिल्वा त्याच्या टर्निंग बॉल्सनं फलंदाजांना घुडघे टेकावे लागतात. फलंदाजी करताना धनंजया डी सिल्वा शानदार चौकार, षटकाराचा संघासाठी पाऊस पाडतो. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 82 एकदिवसीय सामन्यांमध्ये धनंजयानं 26.53 च्या सरासरीनं आणि 57.24 च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या आहेत. त्यानं 10 शतकांच्या मदतीने 1 हजार 725 रण केले आहेत. तर, त्यानं 4.95 च्या इकॉनॉमीसह 44 विकेट्स घेतल्या आहेत.
  • दसुन शनाका : कर्णधार दासुन शनाकाचं नावही श्रीलंकेच्या प्रमुख खेळाडूंमध्ये सामील आहे. शनाका केवळ संघाचे नेतृत्व करत नाही, तर फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. शनाका फिनिशरची भूमिका पूर्णत्वास नेण्यास सक्षम आहे. तो चेंडूवर प्रभावी ठरू शकतो. शनाकानं 67 सामन्यांत 22.29 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 92.04 असा आहे. त्यानं दोनशे तीन अर्धशतकांसह 1 हजार 024 धावा केल्या आहेत. शनाकानं 5.72 च्या इकॉनॉमीसह 27 विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा -

  1. World cup 2023 : विश्वचषकाचा भारतच प्रबळ दावेदार, रोहित विश्वचषकात बजावणार मोठी भूमिका
  2. Cricket World Cup २०२३ : श्रीलंकेच्या 'या' पाच प्रमुख खेळाडूंवर राहणार विशेष नजर; कामगिरीत आहेत अव्वल
  3. Cricket World Cup २०२३ : नेदरलँडचे 'हे' पाच खेळाडू बदलू शकतात विश्वचषक सामन्याची दिशा; जाणून घ्या...

Last Updated : Oct 1, 2023, 7:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.