ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 ENG vs NZ : न्यूझीलंडनं वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडला लोळवलं - नरेंद्र मोदी स्टेडियम

Cricket World Cup 2023 ENG vs NZ : एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा पहिला सामना न्यूझीलंड, इंग्लंड यांच्यात खेळला गेला. न्यूझीलंडनं हा सामना 9 गडी राखून जिंकलाय. यासह न्यूझीलंडनं 2019 विश्वचषक फायनलमधील पराभवाचा बदला घेतला.

Cricket World Cup 2023 ENG vs NZ
Cricket World Cup 2023 ENG vs NZ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2023, 1:52 PM IST

Updated : Oct 5, 2023, 9:39 PM IST

अहमदाबाद Cricket World Cup 2023 ENG vs NZ : न्यूझीलंडनं ODI विश्वचषक 2023 च्या सलामीच्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. यासह, न्यूझीलंड संघानं विश्वचषकाला धमाकेदार सुरुवात केली आहे. या विजयासह संघानं विश्वचषक 2019 विश्वचषक फायनलमधील पराभवाचा बदला घेतला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 282 धावा केल्या. संघाकडून जो रूटनं 86 चेंडूत 77 धावा केल्या. कर्णधार जोस बटलरनं 43, जॉनी बेअरस्टोनं 33 धावा केल्या. न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीनं सर्वाधिक ३ बळी घेतले. तर मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्सनं प्रत्येकी 2 बळी घेतले.

रचिनस कॉनवे यांची 273 धावांची भागीदारी : 283 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं 36.2 षटकात 1 गडी गमावून सामना जिंकला. न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला रचिन रवींद्र यांनी कमाल केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 273 धावांची नाबाद भागीदारी केली. कॉनवेनं 121 चेंडूत नाबाद 152 धावा केल्या. रचिननं 96 चेंडूत नाबाद 123 धावा केल्या. कॉनवेनं आपल्या खेळीत 19 चौकार, 3 षटकार ठोकले. रचिननं 11 चौकार, 5 षटकार मारले. दोघांच्या आक्रमक फलंदाजीसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल दिसत होते. इंग्लंडकडून फक्त सॅम कुरननं एक विकेट घेतली.

इंग्लंडसाठी जो रूट टॉप स्कोअरर : नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 50 षटकात 9 गडी गमावून 282 धावा केल्या. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटनं सर्वाधिक 77 धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला 50 धावांचा टप्पा गाठता आला नाही. कर्णधार जोस बटलरनं 43 धावा केल्या. जॉनी बेअरस्टोनं 33, हॅरी ब्रूकने 25, लियाम लिव्हिंगस्टोननं 20 धावा केल्या. आदिल रशीदनं नाबाद 15, डेव्हिड मलान, सॅम करननं प्रत्येकी 14, तर मार्क वुडनं नाबाद 13, मोईन अली, ख्रिस वोक्सने प्रत्येकी 11 धावा केल्या.

मॅट हेन्रीनं घेतले तीन बळी : या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना लोळवलंय. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या संघाला जोरदार धुतलं. वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीनं सर्वाधिक 3 बळी घेतले. फिरकीपटू मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. ट्रेंट बोल्ट, रचिन रवींद्रनं प्रत्येकी एक विकेट घेतली.

  • 20:14 ऑक्टोबर 05

ENG Vs NZ Live Updates: रचिन रवींद्रचं ODI मध्ये पहिलं शतक

न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रनं त्याच्या क्रिकेट विश्वचषक पदार्पणाच्या सामन्यात पहिलं शतक झळकावलं. रचिननं केवळ 82 चेंडूंचा सामना करत पहिलं एकदिवसीय शतक झळकावलं. या खेळीत त्यानं 9 चौकार, 4 षटकार ठोकलाय.

20:06 ऑक्टोबर 05

ENG Vs NZ Live Updates: डेव्हॉन कॉनवेनं नं शतक ठोकलं

न्यूझीलंडचा स्टार सलामीवीर फलंदाज डेव्हॉन कॉनवेनं क्रिकेट विश्वचषक 2023 चं पहिलं शतक झळकावलंय. कॉनवे सामन्याच्या सुरुवातीपासूनच जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. कॉनवेनं 83 चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केलंय. या स्फोटक खेळीत कॉनवेनं आतापर्यंत 13 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत.

  • 7 : 19 ऑक्टोबर 05

न्यूझीलंडच्या 100 धावा पूर्ण :

न्यूझीलंडनं 100 धावा पूर्ण केल्या आहेत. रचिन रवींद्र आणि डेव्हन कॉनवे यांनी आपापलं अर्धशतक पूर्ण केलंय. या दोन्ही खेळाडूंचं विश्वचषकातील हे पहिलंच अर्धशतक आहे. न्यूझीलंडनं 13 षटकात 107 धावा केल्या आहेत. रचिन 55 तर कॉनवे 51 धावांवर खेळत आहे.

18:52 ऑक्टोबर 05

ENG vs NZ Live Updates: इंग्लंडनं दिलेल्या 284 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली आहे. 10 षटकांअखेर न्यूझीलंडनं 1 गडी गमावला आहे. रचिन रवींद्र (47) आणि डेव्हॉन कॉनवे (33) धावा केल्यानंतर मैदानावर खेळत आहेत.

  • 18:14 ऑक्टोबर 05

न्यूझीलंडला पहिला धक्का : ENG vs NZ Live Updates: दुसऱ्या षटकात न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम कुरननं दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंगला बाद केलंय.

  • इंग्लंडनं दिलं 282 धावाचं लक्ष : क्रिकेट विश्वचषकाचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेकनंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 50 षटकात 9 गडी बाद 282 धावा केल्या.
  • 17:16 ऑक्टोबर 05

ENG vs NZ Live Updates: 46व्या षटकात इंग्लंडची 9वी विकेट पडलीय. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीनं 46व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर टॉम लॅथमच्या हाती सॅम कुरनला (14) झेलबाद केलं.

  • 16:59 ऑक्टोबर 05

ENG vs NZ Live Updates: 42 व्या षटकात इंग्लंडची 7वी विकेट पडलीय. 77 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर न्यूझीलंडचा ऑफस्पिनर ग्लेन फिलिप्सनं 42 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जो रूटला क्लीन बोल्ड केलं. या चेंडूवर रूट रिव्हर्स स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न करत होता.

  • 16:48 ऑक्टोबर 05

ENG vs NZ Live Updates: इंग्लंडची सहावी विकेट 39 व्या षटकात पडलीय. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनं 20 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर लियाम लिव्हिंगस्टोनला मॅच हेन्रीकडं झेलबाद केलं.

  • 16:21 ऑक्टोबर 05

ENG vs NZ Live Updates: इंग्लंडची 5वी विकेट पडली

न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीनं शानदार फलंदाजी करणाऱ्या जोस बटलरला 34व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तंबूत पाठवलं. बटलरनं 43 धावा केल्या.

  • 16:12 ऑक्टोबर 05

ENG vs NZ Live Updates: 30 षटकांनंतर इंग्लंडचा संघ सामन्यात चमकदारपणे कामगिरी करत आहे. जो रूट (50) आणि जोस बटलर (30) धावा केल्यानंतर क्रीजवर उपस्थित आहेत.

  • 16:08 ऑक्टोबर 05

ENG vs NZ Live Updates: जो रूटनं विश्वचषक 2023 मधील पहिलं अर्धशतक झळकावलंय. इंग्लंडचा उजव्या हाताचा स्टार फलंदाज जो रूटनं 57 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. 2023 च्या क्रिकेट विश्वचषकातील हे पहिलं अर्धशतक आहे. या डावात रुटनं आतापर्यंत 2 चौकार, 1 षटकार मारला आहे.

  • 15:34 ऑक्टोबर 05

ENG vs NZ Live Updates: इंग्लंडची चौथी विकेट 22 व्या षटकात पडली. न्यूझीलंडचा गोलंदाज ग्लेन फिलिप्सनं 22 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मोईन अलीला 11 धावांवर क्लीन बोल्ड केलं.

  • 17 व्या षटकात इंग्लंडची तिसरी विकेट पडली : इंग्लंडचा फिरकीपटू रचिन रवींद्रने 17व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हॅरी ब्रूकला 25 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर डेव्हन कॉनवेकडं झेलबाद केलं. या षटकात ब्रूकनं तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या चेंडूवर सलग दोन चौकार, एक षटकार ठोकला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर तो कॉनवेकरवी झेलबाद झाला.
  • 15:03 ऑक्टोबर 05

ENG vs NZ Live Updates : 13व्या षटकात इंग्लंडची दुसरी विकेट पडली. चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असलेला न्यूझीलंडचा स्टार फिरकी गोलंदाज मिचेल सँटनर 13व्या षटकाच्या 5व्या चेंडूवर डॅरिल मिशेलकरवी झेलबाद झाला.

  • 14:49 ऑक्टोबर 05

ENG vs NZ Live Updates : इंग्लंडची 10 षटकं पूर्ण झाली. 10 षटकांच्या अखेरीस इंग्लंडने 1 गडी गमावून 51 धावा केल्या. जॉनी बेअरस्टो (31) जो रूट (4) धावा केल्यानंतर क्रीजवर उपस्थित आहेत.

  • ENG vs NZ Live Updates: इंग्लंडची पहिली विकेट पडली. डेव्हिड मलान 14 धावा करून बाद झालाय. मॅट हेन्रीच्या चेंडूवर तो बाद झाला.

अहमदाबाद Cricket World Cup 2023 ENG vs NZ : अवघ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेल्या आयसीसी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेला आज अहमदाबाद येथून सुरुवात झालीय. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेतील विजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीचा सामना येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. आजच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमनं नाणेफेक जिंकत गतविश्वविजेत्या इंग्लंडला फलंदाजीचं आमंत्रण दिलंय.

काय आहे दोन्ही संघांची प्लेयींग इलेव्हन :

इंग्लंड : जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, हैरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार, यष्टिरक्षक), लियाम लिविंगस्टोन, मोइन अली, सैम करन, क्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड

न्यूझीलंड : डेवोन कॉन्वे, विल यंग, रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, टॉम लाथम (कर्णधार, यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चैपमैन, मैट हेनरी, मिचेल सैंटनर, जेम्स नीशम, ट्रेंट बोल्ट

विश्वचषक स्पर्धा ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे.

Last Updated : Oct 5, 2023, 9:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.