ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : पाचवेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा विजेतेपदाचा दावेदार, जाणून घ्या संघाची ताकद आणि कमजोरी

Cricket World Cup 2023 : पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली पाच वेळा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया भारतात होणाऱ्या विश्वचषकात चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. त्याआधी आम्ही तुम्हाला या संघाची ताकद आणि कमजोरी सांगणार आहोत.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 10:54 AM IST

हैदराबाद Cricket World Cup 2023 : भारतीय भूमीवर विश्वचषकाची ट्रॉफी उचलण्यासाठी १० संघांमध्ये लढत होईल. पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया नेहमीप्रमाणेच यंदाही वर्ल्डकप जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. हा संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अव्वल आहे. मात्र या संघात काही कमजोरी देखील आहेत. चला तर मग, विश्वचषकापूर्वी जाणून घेऊया ऑस्ट्रेलियाची ताकद, कमकुवतपणा तसेच संघाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी...

ताकद :

मजबूत गोलंदाजी आक्रमण - ऑस्ट्रेलियन संघाची मजबूत बाजू म्हणजे त्यांची गोलंदाजी. या संघाकडं पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांच्या रुपानं तीन जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. कमिन्स, स्टार्क आणि हेझलवूड हे त्रिकूट या विश्वचषकातील सर्वात घातक गोलंदाजी आक्रमणांपैकी एक आहे. याशिवाय लेगस्पिनर अ‍ॅडम झाम्पाही भारतीय खेळपट्ट्यांवर चांगली कामगिरी करू शकतो.

वेगवान गोलंदाजांचं घातक त्रिकूट : मिचेल स्टार्कनं जानेवारी २०२३ पासून भारतात खेळल्या गेलेल्या ४ एकदिवसीय सामन्यांमध्ये २४.६६ च्या सरासरीनं ९ विकेट घेतल्या आहेत. हेझलवूडनं ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत ७४ एकदिवसीय सामन्यांमध्ये २६.४ च्या सरासरीनं आणि ४.७० च्या उत्कृष्ट इकॉनॉमीनं ११६ बळी घेतले आहेत. कर्णधार कमिन्स देखील काही कमी नाही. त्यानं ७७ एकदिवसीय सामन्यांमध्ये २८ च्या सरासरीनं आणि ५.२३ च्या इकॉनॉमीसह १२६ बळी घेतले आहेत. अ‍ॅडम झाम्पानं १६ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय खेळपट्ट्यांवर ३०.७७ च्या सरासरीनं २७ बळी घेतले आहेत.

आक्रमक फलंदाजी लाइनअप : ऑस्ट्रेलियाकडं मजबूत गोलंदाजीसह आक्रमक फलंदाजी लाइनअप आहे. या संघात डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉइनिससारखे पॉवर हिटर फलंदाज आहेत. यासोबतच स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन हे मधल्या फळीला बळ देतात. या वर्षी मार्नस लॅबुशेननं ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यानं १० सामन्यांमध्ये १ शतक आणि २ अर्धशतकांच्या मदतीनं ४६४ धावा केल्या आहेत. यात त्याची सरासरी ५१.५५ तर स्ट्राइक रेट ९३.१७ आहे.

डेव्हिड वॉर्नर आहे 'एक्स फॅक्टर' : लॅबुशेन व्यतिरिक्त, मिचेल मार्श हा ऑस्ट्रेलियाकडून वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. मार्शनं १० सामन्यांत १२१.५७ च्या स्ट्राईक रेटनं आणि ४६.३३ च्या सरासरीनं ४१७ धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियासाठी वनडे फॉरमॅटमध्ये यावर्षी सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू आहे. त्यानं यावर्षी ३९० धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, वॉर्नरनं भारताविरुद्ध खेळलेल्या ९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३ अर्धशतकं झळकावली आहेत.

ऑस्ट्रेलियाची कमजोरी :

दुखापती आणि सामन्याची वेळ - या विश्वचषकात खेळाडूंना झालेल्या दुखापती आणि तयारीसाठी पुरेसा वेळ न मिळणं ही संघासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांच्यासह संघातील काही महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे वनडे संघाबाहेर होते. हे खेळाडू विश्वचषकासाठी संघात परतले आहेत. पण अजूनही त्यांच्या मॅच फिटनेसवर मोठं प्रश्नचिन्ह आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्यापूर्वी या खेळाडूंना सरावासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. पॅट कमिन्सनं २, ग्लेन मॅक्सवेलनं १, स्टीव्ह स्मिथनं ६ आणि मिचेल स्टार्कनं ४ सामने खेळले आहेत. २०२३ च्या विश्वचषकापूर्वी हे खेळाडू पुरेसे सामने न खेळणं हा संघासाठी चिंतेचा विषय बनू शकतो.

फिरकी विभाग - या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या संघाला फिरकी गोलंदाजांची कमतरता भासू शकते. सध्या संघात अ‍ॅडम झाम्पा हा एकमेव स्पेशालिस्ट स्पिनर आहे. झाम्पाशिवाय संघात दुसरा अनुभवी फिरकीपटू नाही. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन संघात आणखी एका तज्ज्ञ फिरकी गोलंदाजाची अनुपस्थिती संघासाठी कमजोरी ठरू शकते.

युवा प्रतिभांना संधी : ऑस्ट्रेलियाच्या युवा खेळाडूंना या विश्वचषकात मोठ्या मंचावर चमक दाखवण्याची संधी आहे. जोश इंग्लिस, अ‍ॅलेक्स कॅरी, मार्नस लॅबुशेन आणि कॅमेरुन ग्रीन त्यांचा पहिला एकदिवसीय विश्वचषक खेळत आहेत. या खेळाडूंमध्ये भारतीय खेळपट्ट्यांवर चमकदार कामगिरी करण्याची क्षमता आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि मार्कस स्टॉइनिस या खेळाडूंचं वय वाढत आहे. त्यामुळे हा त्यांचा शेवटचा विश्वचषक ठरू शकतो.

दबावाची परिस्थिती : ऑस्ट्रेलियानं जरी आतापर्यंत ५ विश्वचषक जिंकले असतील, पण या संघात काही नवीन आणि तरुण खेळाडूही आहेत. या सगळ्यांसाठी बाद फेरीच्या सामन्यांच्या दडपणाला सामोरं जाणं आणि स्वत:ची मानसिक आणि शारीरिक तयारी ठेवणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार : या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला आपल्या सर्व उणिवांवर मात करावी लागणार आहे. त्यांना विश्वचषकात प्रत्येक कठीण परिस्थितीत उत्कृष्ट कामगिरी दाखवावी लागेल. या बरोबरच युवा खेळाडूंना चांगली कामगिरी करण्याचं प्रोत्साहन देण्याची जबाबदारी वरिष्ठ खेळाडूंवर असेल. ऑस्ट्रेलियाकडं विश्वचषक जिंकण्याचा अनुभव असणारे खेळाडू तसेच युवा खेळाडूंचा योग्य मिलाफ आहे. त्यामुळे हा संघ ट्रॉफी उंचावण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : सलग दोन विश्वचषकात फायनलमध्ये पराभव, आता तरी न्यूझीलंडचा ट्रॉफीचा दुष्काळ संपणार का?
  2. Cricket world cup 2023 : ना धोनी, ना युवराज; कोणते आहेत वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे टॉप-५ फलंदाज
  3. Cricket World Cup 2023 : 'भारत उपांत्य फेरीत नक्कीच प्रवेश करणार', किरण मोरेंची भविष्यवाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.