ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : बांग्लादेशच्या 'या' ५ खेळाडूंना अजिबात हलक्यात घेऊ नका, जाणून घ्या कोण आहेत हे खेळाडू

Cricket World Cup 2023 : बांग्लादेशची क्रिकेट टीम वर्ल्डकपमध्ये उतरण्यास सज्ज आहे. हा संघ आपल्या कामगिरीनं भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांना कडवी टक्कर देऊ शकतो. या संघातील कोणते खेळाडू विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात, जाणून घेऊया.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 9:09 AM IST

Updated : Oct 1, 2023, 9:25 AM IST

हैदराबाद Cricket World Cup 2023 : बांग्लादेशची क्रिकेट टीम मोठ्या स्पर्धांमध्ये चांगल्या कामगिरीसाठी ओळखली जाते. या संघामध्ये कोणत्याही आघाडीच्या टीमला धक्का देण्याची क्षमता आहे. बांग्लादेशनं २००७ च्या विश्वचषकात भारतासारख्या बलाढ्य संघाचा पराभव करून त्यांना स्पर्धेतून बाहेर फेकलं होतं. याशिवाय बांग्लादेशनं सुपर ८ मध्ये दक्षिण आफ्रिकेचाही पराभव केला आहे. १९९९ च्या विश्वचषकात बांग्ला टायगर्सनं पाकिस्तानचाही पराभव केला होता. त्यामुळेच या टीमला हलक्यात घेणं कोणत्याही संघाला महागात पडू शकतं. चला तर मग जाणून घेऊया बांग्लादेशचे कोणते ५ प्रमुख खेळाडूं ठरू शकतील संघाचे ट्र्म्प कार्ड.

  1. शाकिब अल हसन : बांग्लादेशचा कर्णधार आणि जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन हा संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. एकीकडे तो आपल्या फिरकीनं विरोधी फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवतो, तर दुसरीकडे तो बॅटनंही मैदानावर क्षमता सिद्ध करतो. याशिवाय शाकिब त्याच्या स्फोटक चौकार आणि गगनचुंबी षटकारांसाठी ओळखला जातो. शाकिबनं आतापर्यंत २४० एकदिवसीय सामन्यांमध्ये ४.४४ च्या इकॉनॉमीनं ३०८ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्यानं ३७.७ च्या उत्कृष्ट सरासरीनं ७३८४ धावा ठोकल्या आहेत.
    Cricket World Cup 2023
    शाकिब अल हसन
  2. मुशफिकुर रहीम : बांग्लादेशचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम संघासाठी महत्त्वाचा खेळाडू असेल. तो पहिल्या चेंडूपासून चौकार आणि षटकार लगावण्यास सक्षम आहे. याशिवाय विकेटकीपिंगमध्येही तो बिबट्यासारखी चपळता दाखवतो. त्यानं अनेकदा विकेटच्या मागे शानदार झेल आणि उत्कृष्ट स्टंपिंग केली आहे. मुशफिकुर रहीमनं आतापर्यंत २५६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ९ शतकं आणि ४६ अर्धशतकांच्या मदतीनं ७४०६ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी ३७.०३ असून स्ट्राइक रेट ७९.६२ एवढा होता. याशिवाय त्यानं विकेटमागे २२२ झेल, १० रन आउट आणि ५५ स्टंपिंग्ज केली आहे.
    Cricket World Cup 2023
    मुशफिकुर रहीम
  3. मुस्तफिजुर रहमान : जागतिक दर्जाचे अनेक मोठे-मोठे फलंदाज मुस्तफिजुर रहमानच्या गोलंदाजीपुढे गुडघे टेकतात. हा वेगवान गोलंदाज त्याच्या स्लोअर बॉलनं फलंदाजांना उद्ध्वस्त करतो. तसेच तो त्याच्या उत्कृष्ट कटर बॉलसाठीही ओळखला जातो. त्याच्या गोलंदाजीत अनेक मिश्रणाचा समावेश आहे. सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट घेण्याव्यतिरिक्त, तो डेथ ओव्हर्समध्येही चमकदार गोलंदाजी करू शकतो. विशेष म्हणजे, भारतीय खेळपट्ट्यांवर त्यानं नेहमीच चमकदार कामगिरी केली आहे. याशिवाय आयपीएलमध्येही तो फलंदाजांना आपल्या तालावर नाचवतो. मुस्तफिजुरनं ९३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५.०७ च्या इकॉनॉमीसह १५६ विकेट घेतल्या आहेत.
    Cricket World Cup 2023
    मुस्तफिजुर रहमान
  4. मेहंदी हसन मिराज : मेहंदी हसन बांग्लादेशसाठी एक महत्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. नुकत्याच झालेल्या आशिया कप २०२३ मध्ये त्यानं बॅटनं संघासाठी चमकदार कामगिरी केली होती. तसेच तो आपल्या उत्कृष्ट ऑफ-स्पिननं भारतीय खेळपट्ट्यांवर कहर करू शकतो. बांग्लादेशसाठी त्यानं आतापर्यंत ८० एकदिवसीय सामन्यांमध्ये २३.२४ च्या सरासरीनं १०४६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्यानं २ शतकं आणि २ अर्धशतकही ठोकले. याशिवाय त्यानं गोलंदाजीत ४.७३ च्या उत्कृष्ट इकॉनॉमीसह ९१ विकेट्स घेतल्या आहेत.
    Cricket World Cup 2023
    मेहंदी हसन मिराज
  5. लिटन दास : लिटन दास हा या विश्वचषक स्पर्धेत एक धोकादायक फलंदाज म्हणून उदयास येऊ शकतो. तो त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. क्रिजवर येताच तो केवळ षटकार आणि चौकारांच्या भाषेत डील करतो. त्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्फोटक खेळी खेळून आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे. २०२२ च्या टी-२० विश्वचषकात त्यानं भारताविरुद्ध शानदार फलंदाजी केली होती. दासनं आतापर्यंत ७७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३२.६० ची सरासरी आणि ८७.६१ च्या स्ट्राईक रेटनं २२५० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं ५ शतकं आणि १० अर्धशतकं ठोकली.
    Cricket World Cup 2023
    लिटन दास

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : विश्वचषकात कोणत्या संघाचं पारडं जड? कोणता खेळाडू ठरू शकतो 'ट्रम्प कार्ड'? जाणून घ्या प्रत्येक संघाबद्दल सविस्तरपणे
  2. Cricket World Cup : १९७५ पासून २०१९ विश्वचषकातील कामगिरी; प्रत्येक विश्वचषकात टीम इंडियाची कामगिरी कशी होती? जाणून घ्या सोप्या शब्दात

Last Updated : Oct 1, 2023, 9:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.