लॉर्ड्स - सुपरओव्हरच्या थरारनाट्यात रंगलेल्या विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय मिळवला. न्यूझीलंडने तोडीस-तोड खेळ केला मात्र, चौकार आणि षटकाराच्या नियमानुसार इंग्लंडला पहिल्यांदा विश्वकरंडक उंचावता आला. न्यूझीलंड संघाला हे विश्वविजेतेपद पटकावण्यात अपयश आले. सोबतच, भारताचा एक विक्रमही न्यूझीलंडच्या पराभवाने अबाधित राहिला.
विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या इतिहासात फक्त भारतीय संघाने 241 धावांच्या आत समोरच्या संघाला रोखले होते. 1983 मध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताने वेस्ट इंडिजला 140 धावांत सर्वबाद केले होते. त्यामुळे यंदाच्या विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला रोखले असते तर तो भारतानंतरचा दुसरा संघ ठरला असता. मात्र, हा विक्रम करण्यास न्यूझीलंडला अपयश आले.
-
The only team to successfully defend less than 241 to win a Men's Cricket World Cup final were India in #CWC83
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Can New Zealand capture the Kapil Dev magic?#CWC19 | #CWC19Final | #BackTheBlackCaps pic.twitter.com/qKnH6Hmoud
">The only team to successfully defend less than 241 to win a Men's Cricket World Cup final were India in #CWC83
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 14, 2019
Can New Zealand capture the Kapil Dev magic?#CWC19 | #CWC19Final | #BackTheBlackCaps pic.twitter.com/qKnH6HmoudThe only team to successfully defend less than 241 to win a Men's Cricket World Cup final were India in #CWC83
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 14, 2019
Can New Zealand capture the Kapil Dev magic?#CWC19 | #CWC19Final | #BackTheBlackCaps pic.twitter.com/qKnH6Hmoud
लॉर्ड्सवर रंगणाऱ्या या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने सावध फलंदाजीला सुरुवात केली. सलामीवीर मार्टिन गुप्टीलला वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने 19 धावांवर माघारी धाडत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या केन विल्यमसनने सलामीवीर हेन्री निकोलसला साथीला घेत संघाचे शतक धावफलकावर लावले. विल्यमसनने 30 तर, निकोलसने 4 चौकारांसह 55 धावांची उपयुक्त खेळी केली. विल्यमसन आणि निकोलस बाद झाल्यावर अनुभवी रॉस टेलरही स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर आलेल्या टॉम लॅथमने कॉलिन डी ग्रँडहोमेसह छोटी भागिदारी रचली. लॅथमने केलेल्या 47 धावांच्या खेळीमुळे न्यूझीलंडला सव्वादोनशेचा टप्पा गाठता आला.