ओडिसा - विश्वकरंडक स्पर्धेत भारताने पाकवर मिळवलेल्या दमदार विजयानंतर भारतीय संघावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनीही एका बॅटच्या आकाराचे वाळूचे शिल्प कोरून भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.
पटनायक यांनी ओडिसामधल्या पुरीच्या किनाऱ्यावर हे वाळूशिल्प कोरले आहे. यात त्यांनी २० फूट लांबीच्या आकाराची बॅट काढली असून त्यावर विंग कमांडर अभिनंदनच्या प्रसिद्ध मिशीचा वापर करून 'अभिनंदन टीम इंडिया' असे लिहीले आहे.
सुदर्शन पटनायक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वाळू शिल्पकार असून ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. विश्वकरंडक स्पर्धेत भारत - पाकिस्तानच्या सामन्यासाठी विंग कमांडर अभिनंदनचा आशय घेऊन पाकिस्तानने जाहिरातबाजी केली होती.