कार्डिफ - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज श्रीलंका आणि अफगाणिस्तान या दोन आशियाई संघांचे युद्ध पाहायला मिळणार आहे. सलामीच्याच सामन्यात या दोन्ही संघांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे संघ विजयारंभ करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. हा सामना कार्डिफ वेल्स स्टेडियमवर दुपारी ३ वाजता चालू होईल.
सलामीच्याच सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्ध सपशेल शरणागती पत्करली होती. त्यांना १० गड्यांनी मात खावी लागली होती. कर्णधार दिमुथ करुणारत्ने सोडून सर्व फलंदाज अपयशी ठरले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात फलंदाजीवर त्यांना विशेष भर द्यावा लागेल.
दुसऱया बाजुला अफगाणिस्तान पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाला असला तरी त्यांनी चांगली झुंज दिली होती. गोलंदाजीत ‘प्रमुख खेळाडू’ राशिद खान, अष्टपैलू मोहम्मद नबी व हामिद हसन यांच्यावर संघाची मदार असेल.
श्रीलंकेचा संघ -
- दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, थिसारा परेरा, कुशल परेरा, धनंजय डिसेल्वा, कुशल मेंडिस, आयसुरु उडाना, मिलींदा सिरिवर्धना, अविष्का फर्नांडो, जीवन मेंडिस, लाहिरु थिरिमन्ने, जेफ्री वंडरसे, नुवान प्रदीप, सुरांगा लकमल.
अफगाणिस्तानचा संघ -
- गुलाबदीन नाईब (कर्णधार), मोहम्मद शहजाद, नूर अली झादरान, हजरतुल्लाह जजाई, रहमत शाह, असघर अफगाण, हशमतुल्लाह शाहीदी, नजीबुल्लाह झादरान, समिउल्लाह शिनवारी, मोहम्मद नबी, राशिद खान, दौलत झादरान, आफताब आलम, हामिद हसन, मुजीब उर रहमान.