लंडन - आयसीसी विश्वकप 2019 मध्ये बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने बांग्लादेशावर 94 धावांनी विजय मिळविला. या विजयानंतर पाकिस्तान संघाचा अनुभवी खेळाडू शोएब मलिकने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
-
Shoaib Malik announces retirement from ODI cricket
— ANI Digital (@ani_digital) July 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI story | https://t.co/hBbL8gMiYN pic.twitter.com/tvcBOKz0yK
">Shoaib Malik announces retirement from ODI cricket
— ANI Digital (@ani_digital) July 5, 2019
Read @ANI story | https://t.co/hBbL8gMiYN pic.twitter.com/tvcBOKz0yKShoaib Malik announces retirement from ODI cricket
— ANI Digital (@ani_digital) July 5, 2019
Read @ANI story | https://t.co/hBbL8gMiYN pic.twitter.com/tvcBOKz0yK
यंदाच्या चालू असलेल्या विश्वचषकामध्ये विशेष कामगिरी करता आली नाही. या विश्वचषक स्पर्धेत त्याने 3 सामने खेळले आणि केवळ 8 धावा केल्या. मलिकने भारताविरूद्धचा शेवटचा सामना खेळला ज्यामध्ये तो शून्यवर बाद झाला. त्यामुळे चाहते त्यावर नाराज होते. यानंतर त्याच्या जागी हरिस सोहेलला संघात स्थान देण्यात आले. सोहेलने चांगले प्रदर्शन केले आणि त्यानंतर मलिकला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
शोएब मलिकने आंतरराष्टीय एकदिवसीय क्रिकेटच्या कारकिर्दीत 9 शतक आणि 44 अर्ध शतके ठोकली आहेत. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 158 बळी घेतल्या आहे. तर 7534 धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्टीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा ही आपल्या टिव्टर अकाऊंटद्वारे दिली. यात शोएबने आपल्या सहकाऱ्यांचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत.