ETV Bharat / sports

CRICKET WORLDCUP : आफ्रिकेला धक्का दिल्यानंतर शाकिबने केले 'हे' वक्तव्य - cricket worldcup 2019

बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनने ७५ धावांची उपयुक्त खेळी करत सामनावीराचा मान पटकावला. शिवाय गोलंदाजी करताना एक बळीसुद्धा घेतला. सामना संपल्यावर शाकिबने संघाच्या प्रदर्शनावर भाष्य केले.

शाकिब अल हसन
author img

By

Published : Jun 3, 2019, 2:25 PM IST

लंडन - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशने आफ्रिकेवर धक्कादायक मात करत स्पर्धेतल्या पहिल्यावहिल्या विजयाची नोंद केली. या सामन्यात बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनने ७५ धावांची उपयुक्त खेळी करत सामनावीराचा मान पटकावला. शिवाय गोलंदाजी करताना एक बळीसुद्धा घेतला. सामना संपल्यावर शाकिबने संघाच्या प्रदर्शनावर भाष्य केले.

यापेक्षा चांगली सुरुवात असुच शकत नाही. आम्हाला अशीच सुरुवात गरजेची होती. त्यामुळे हा विजय आम्ही मिळवलेल्या चांगल्या विजयांपैकी एक असल्याचे शाकिबने म्हटले आहे.

शाकिब पुढे म्हणाला, आम्ही इंग्लंडला पूर्ण आत्मविश्वास घेऊन आलो आहोत. या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये चांगले वातावरण आहे, पण ही फक्त सुरुवात आहे. वॉर्कशायरबरोबर मी २ वर्ष खेळलो असल्याने त्याचा मला फायदा झाला. या विजयामुळे आमचा आत्मविश्वास वाढला असून न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात आम्ही संपूर्ण तयारीनिशी उतरू.

आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी बांगलादेशने ३३१ धावांचे आव्हान दिले होते. किंग्जस्टन ओव्हल, लंडन येथे रंगलेल्या रोमांचक सामन्यात बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेवर २१ धावांनी विजय मिळवला आहे.

Intro:Body:

sport

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.