नवी दिल्ली - पाकिस्तान विरुध्दच्या सामन्यात भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्माने खणखणीत शतक झळकावत ११३ चेंडूत १४० धावांची खेळी केली. या सामन्यामध्ये भारताने पाकवर ८९ धावांनी विजय मिळवला. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने पाकिस्तानच्या एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला गमतीशीर उत्तर दिले.
या पत्रकाराने प्रथम रोहितने केलेल्या जबरदस्त कामगिरीचे कौतुक केले. त्यानंतर ‘सध्या संघर्ष करणाऱ्या पाकिस्तानच्या फलंदाजांना तू काय सल्ला देशील?’ असा प्रश्न विचारला.
-
#INDvsPAK #ICCCWC2019 Rohit Sharma’s amusing reply to Pak journalist during post match Press Conf.
— Anirudh Kalia (@anirudhkalia) June 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Ro-Hit bhi, Ro-Subtle bhi @ImRo45 @imVkohli pic.twitter.com/8OQ19k9fAQ
">#INDvsPAK #ICCCWC2019 Rohit Sharma’s amusing reply to Pak journalist during post match Press Conf.
— Anirudh Kalia (@anirudhkalia) June 17, 2019
Ro-Hit bhi, Ro-Subtle bhi @ImRo45 @imVkohli pic.twitter.com/8OQ19k9fAQ#INDvsPAK #ICCCWC2019 Rohit Sharma’s amusing reply to Pak journalist during post match Press Conf.
— Anirudh Kalia (@anirudhkalia) June 17, 2019
Ro-Hit bhi, Ro-Subtle bhi @ImRo45 @imVkohli pic.twitter.com/8OQ19k9fAQ
या सामन्यामध्ये पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा सलामीला के. एल. राहुलसोबत उतरत रोहित शर्माने खणखणीत १४० धावांची खेळी केली. रोहितच्या या खेळीने पाकिस्तानच्या गोलंदाजांना 'सळो की पळो' करुन सोडले.