लंडन - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज स्पर्धेबाहेर पडलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेश या संघामध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 315 धावा केल्या आहेत. पाकिस्तानकडून इमाम उल हकने शतकी खेळी केली तर फॉर्मात असलेल्या बाबर आझमने 96 धावांची खेळी करत दोन जबरदस्त विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
बाबरने या स्पर्धेत 8 सामन्यात 474 धावा केल्या आहेत. त्यामुळे पदार्पणाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर झाला आहे. शिवाय २७ वर्षांपूर्वीचा जावेद मियांदादचा विक्रमही त्याने मोडित काढला आहे.
-
Babar Azam has now scored more runs at #CWC19 than any other Pakistani at a single World Cup 🔝
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
He's overtaken Javed Miandad, who scored 437 runs at the 1992 World Cup 😱
Can he get to 500?#WeHaveWeWill | #PAKvBAN pic.twitter.com/Ecs0sG40O0
">Babar Azam has now scored more runs at #CWC19 than any other Pakistani at a single World Cup 🔝
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 5, 2019
He's overtaken Javed Miandad, who scored 437 runs at the 1992 World Cup 😱
Can he get to 500?#WeHaveWeWill | #PAKvBAN pic.twitter.com/Ecs0sG40O0Babar Azam has now scored more runs at #CWC19 than any other Pakistani at a single World Cup 🔝
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 5, 2019
He's overtaken Javed Miandad, who scored 437 runs at the 1992 World Cup 😱
Can he get to 500?#WeHaveWeWill | #PAKvBAN pic.twitter.com/Ecs0sG40O0
१९९२ च्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत जावेद मियांदादने ९ सामन्यात ४३७ धावा केल्या होत्या. बाबरने यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत फक्त ८ सामन्यांत हा विक्रम रचला आहे.