ETV Bharat / sports

ज्या गोलंदाजाच्या चेंडूवर धोनीने षटकार मारुन विश्वकरंडक जिंकवला तो गोलंदाज निवृत्त!

लंकेचा वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्या गोलंदाजाच्या चेंडूवर धोनीने षटकार मारुन विश्वकरंडक जिंकवला तो गोलंदाज निवृत्त!
author img

By

Published : Jul 24, 2019, 3:21 PM IST

कोलंबो - श्रीलंकेचा यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून ख्याती असेलेला लसिथ मलिंगा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर मलिंगा निवृत्त होणार असल्याची माहिती कर्णधार दिमुख करुणरत्नेने दिली होती. मलिंगापाठोपाठ श्रीलंकेला आता अजून एक धक्का बसला आहे.

लंकेचा वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. कुलसेकराने याआधी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठले होते. 37 वर्षीय कुलसेकराने 21 कसोटी, 184 वन डे आणि 58 टी-ट्वेंटी-20 सामन्यांत श्रीलंकेच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 48, वन डेत 199 आणि टी-20मध्ये 66 विकेट्स आहेत.

मलिंगाही होणार निवृत्त - आगामी काळात बांगलादेशचा संघ श्रीलंका दौऱ्यावर येणार आहे. या संघामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका असणार आहे. लसिथ मलिंगाने आपल्या करिअरमध्ये 225 आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळले असून 335 बळी घेतले आहे. वनडे सामन्यात 6-38 अशी उत्तम कामगिरी त्याने केली आहे. मलिंगा निवृत्तीनंतर, ऑस्ट्रेलियाचे कायमस्वरूपी नागरिकत्व घेणार असून त्याच्या कुटुंबासह तो तेथेच स्थायिक होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Intro:Body:

Nuwan Kulasekara announces retirement from international cricket

Nuwan Kulasekara, retirement, international cricket, sri lanka, bowler from srilanka

ज्या गोलंदाजाच्या चेंडूवर धोनीने षटकार मारुन विश्वकरंडक जिंकवला तो गोलंदाज निवृत्त!

कोलंबो - श्रीलंकेचा यॉर्करस्पेशालिस्ट म्हणून ख्याती असेलेला लसिथ मलिंगा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. बांगलागदेशविरुद्ध होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर मलिंगा निवृत्त होणार असल्याची माहिती कर्णधार दिमुख करुणरत्नेने दिली होती. मलिंगापाठोपाठ श्रीलंकेला आता अजून एक धक्का लागला आहे. 

लंकेचा वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. कुलसेकराने याआधी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठले होते. 37 वर्षीय कुलसेकराने 21 कसोटी, 184 वन डे आणि 58 टी-ट्वेंटी-20 सामन्यांत श्रीलंकेच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 48, वन डेत 199 आणि ट्वेंटी-20त 66 विकेट्स आहेत.

मलिंगाही होणार निवृत्त - 

आगामी काळात बांगलादेशचा संघ श्रीलंका दौऱ्यावर येणार आहे. या संघामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका असणार आहे. लसिथ मलिंगाने आपल्या करिअरमध्ये 225 आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळले असून 335 बळी घेतले आहे. वनडे सामन्यात 6-38 अशी उत्तम कामगिरी त्याने केली आहे. मलिंगा निवृत्तीनंतर, ऑस्ट्रेलियाचे कायमस्वरूपी नागरिकत्व घेणार असून त्याच्या कुटुंबासह तो तेथेच स्थायिक होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.