ETV Bharat / sports

CRICKET WC : न्यूझीलंड कर्णधार विल्यमसनवर सामना बंदीची शक्यता, टाळावी लागणार 'ही' चूक - slow over rate

सामन्यामध्ये षटकांची कमी गती राहिल्यामुळे न्यूझीलंडला दंड भरावा लागणार आहे.

CRICKET WC : न्यूझीलंड कर्णधार विल्यमसनवर सामना बंदीची शक्यता, टाळावी लागणार 'ही' चूक
author img

By

Published : Jun 25, 2019, 10:14 AM IST

Updated : Jun 25, 2019, 10:36 AM IST

लंडन - अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत न्यूझीलंडने वेस्ट इंडिजवर अवघ्या ५ धावांनी मात करत विजय मिळवला. या विजयामुळे न्यूझीलंड टीम वर्ल्ड कपच्या १२ व्या सीझनमध्ये अव्वलस्थानी पोहोचली आहे. मात्र, हा विजयाचा आनंद न्यूझीलंडला खऱ्या अर्थाने घेता आला नाही. सामन्यामध्ये षटकांची कमी गती राहिल्यामुळे न्यूझीलंडला दंड भरावा लागणार आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याच्या एक दिवसाच्या मानधनातून २० टक्के तर इतर खेळांडूच्या मानधनातून १० टक्के रक्कम कपात केली जाईल. आयसीसीच्या नियमावलीनुसार हा दंड आकारण्यात येणार आहे. शिवाय, अशी चूक परत घडल्यास विल्यमसनला एका सामन्याला मुकावे लागेल.

ही दंडाची कारवाई पंच इयान गोल्ड ब रुचिरा पल्लीगुरुगे तसेच तिसरे पंच निगेल लॉंग व चौथे पंच रॉड टुकर यांच्यामार्फत केलेल्या अहवालानुसार करण्यात आली आहे. या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या 292 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात अडखळती झाली होती. मात्र, तुफानी शतकी खेळी करताना कार्लोस ब्रेथवेटने लढतीत रंगत आणली होती. शतक पूर्ण केल्यानंतर ब्रेथवेटने मारलेला एक उत्तुंग फटका ट्रेंट बोल्टने सीमारेषेनजीक टिपला आणि न्यूझीलंडला ५ धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला. तरीही या सामन्यातील ब्रेथवेटच्या खेळीचे कौतुक झाले होते.

Intro:Body:

new zealand and skip kane williamson goes for penalty in icc cricket world cup

kane williamson, new zealand, icc, cricket world cup, slow over rate, penalty

CRICKET WC : न्यूझीलंड कर्णधार विल्यमसनवर सामना बंदीची शक्यता, टाळावी लागणार 'ही' चूक

लंडन - अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत न्यूझीलंडने वेस्ट इंडिजवर अवघ्या ५ धावांनी मात करत विजय मिळवला. या विजयामुळे न्यूझीलंड टीम वर्ल्ड कपच्या १२ व्या सीझनमध्ये अव्वलस्थानी पोहोचले आहे. मात्र, हा विजयाचा आनंद न्यूझीलंडला खऱ्या अर्थाने घेता आला नाही. सामन्यामध्ये षटकांचा कमी गती राहिल्यामुळे न्यूझीलंडला दंड भरावा लागणार आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याच्या एक दिवसाच्या मानधनातून २० टक्के तर इतर खेळांडूच्या मानधनातून १० टक्के रक्कम कपात केली जाईल. आयसीसीच्या नियमावलीनुसार हा दंड आकारण्यात येणार आहे. शिवाय, अशी चूक परत घडल्यास विल्यमसनला एका सामन्याला मुकावे लागेल.

ही दंडाची कारवाई पंच इयान गोल्ड ब रुचिरा पल्लीगुरुगे तसेच तिसरे पंच निगेल लॉंग व चौथे पंच रॉड टुकर यांच्यामार्फत केलेल्या अहवालानुसार करण्यात आली आहे. या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या 292 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात अडखळती झाली होती. मात्र, तुफानी शतकी खेळी करताना कार्लोस ब्रेथवेटने लढतीत रंगत आणली होती. शतक पूर्ण केल्यानंतर ब्रेथवेटने मारलेला एक उत्तुंग फटका ट्रेंट बोल्टने सीमारेषेनजीक टिपला आणि न्यूझीलंडला ५ धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला.

Conclusion:
Last Updated : Jun 25, 2019, 10:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.