मँचेस्टर - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या पहिला उपांत्य सामना भारत विरुध्द न्यूझीलंड संघात पार पडला. पावसामुळे दोन दिवस खेळण्यात आलेल्या या सामन्यात जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या भारताला न्यूझीलंडने धक्का देत १८ धावांनी विजय मिळवला. अशा या चुरशीच्या झालेल्या या सामन्यात खेळाडूंनी नव्हे तर, लोकांनी केला एक खास विक्रम केला आहे.
भारत विरुध्द न्यूझीलंड यांच्यात झालेला हा सामना भारताच्या एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्वात जास्त बघितला गेला आहे. २.५३ करोड लोकांनी हा सामना पाहून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. याआधी, या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही सामन्याला इतके दर्शक लाभले नव्हते.
आयसीसीने या विक्रमाची माहिती दिली आहे. गटसाखळीतील सामने आणि उपांत्य सामन्याला टीव्हीवर लाभलेल्या प्रेक्षकांची संख्या आयसीसीने जाहीर केली आहे. ग्रेट ब्रिटनमध्ये टीव्हीवरुन उपांत्य सामना पाहणाऱ्या लोकांची संख्या २ कोटीपर्यंत गेली होती.