नॉटिंगहॅम - सध्या चालू असलेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेला दुखापतींचे ग्रहण तर लागलेच आहे. शिवाय, आणखी एका गोष्टीमुळे विश्वकरंडक स्पर्धा चर्चेत आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत सतत पावसाचा व्यत्यय येत आहे. त्यामुळे गुरुवारी होणारा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना कदाचित रद्द होऊ शकतो.
![ind vs nz](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/match_1006newsroom_1560182292_91.jpg)
नॉटिंगहॅममध्ये येत्या गुरुवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना होणार आहे. परंतु दोन दिवसांपासून इंग्लंडमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे सराव सत्रही कदाचीत रद्द होऊ शकतात.
यापूर्वी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध विंडीज यांच्यातील सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. आजचा बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामनाही पाऊसामुळे थांबला आहे.