मँचेस्टर - विश्वकरंडक स्पर्धेत गुरुवारी झालेल्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यात भारताने १२५ धावांनी विजयी मिळवला. भारतीय संघाचे २६९ धावांचे आव्हान वेस्ट इंडिज संघाला पेलवले नाही. विंडीजचा संपूर्ण संघ १४३ धावांवर गारद झाला. सामन्यात वेस्ट इंडिजचा कॉटरेल बाद झाल्यानंतर मोहम्मद शमीने कॉटरेलच्या या सेलिब्रेशन स्टाईलची नक्कल केली होती. आता या नक्कलवर कॉटरेलची प्रतिक्रिया आली आहे.
कॉटरेलने शमीला चक्क हिंदीत उत्तर दिले आहे. त्याने म्हटले आहे, 'फार मजा आली. उत्तम गोलंदाजी होती. नकल करना ही सबसे बडी चापलूसी है'
-
Great fun! Great bowling. Nakal Karna Hi Sabse Badi Chaploosi Hai 😉 https://t.co/PTuoGJciM7
— Sheldon Cotterell (@SaluteCotterell) June 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Great fun! Great bowling. Nakal Karna Hi Sabse Badi Chaploosi Hai 😉 https://t.co/PTuoGJciM7
— Sheldon Cotterell (@SaluteCotterell) June 28, 2019Great fun! Great bowling. Nakal Karna Hi Sabse Badi Chaploosi Hai 😉 https://t.co/PTuoGJciM7
— Sheldon Cotterell (@SaluteCotterell) June 28, 2019
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत निर्धारित ५० षटकात ७ बाद २६८ धावांवर मजल मारली. यात विराट कोहली (७२) महेंद्रसिंह धोनी (५६), या दोघांची अर्धशतकी खेळी आणि लोकेश राहूल (४८), हार्दिक पांड्या (४६) यांच्या मदतीने विंडीजसमोर २६८ धावांचे आव्हान ठेवले. विंडीजकडून केमार रोचने ३, शेल्डन कॉटरेल आणि जेसन होल्डर याने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर, अफगाणिस्तान विरुध्दच्या सामन्यात ४ बळी घेतलेल्या मोहम्मद शमीने याही सामन्यात ४ बळी मिळवले. तर बुमराह आणि चहलने प्रत्येकी २ बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली. हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक बळी घेतला.