लंडन - अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने केलेल्या अद्भूत खेळाच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडवर मात केली. या विजयासह इंग्लंडने आपल्या कारकिर्दीतील पहिलावहिला विश्वचषक उंचावला. या विजयानंतर, बेन स्टोक्सने न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसनची माफी मागितली आहे.
विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना रंजक अवस्थेत असताना न्यूझीलंडकडून अतिरिक्त चार धावा गेल्या. शेवटच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी 3 चेंडूत 9 धावांची गरज होती. यावेळी स्टोक्सने टोलावलेला चेंडू सीमारेषेवर गेला. हा चेंडू गुप्टीलने अडवला. पण, तोपर्यंत स्टोक्सने एकेरी धाव पूर्ण केली होती. स्टोक्सने दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी उडी घेतली आणि त्याच वेळी गुप्टीलने सीमारेषेवरून फेकलेला चेंडू स्टोक्सच्या बॅटला लागून थेट सीमारेषेपार गेला. या घटनेमुळे इंग्लंडला एकूण 6 धावा मिळाल्या. हा प्रकार स्टोक्सने जाणूनबूजून केला नव्हता. पण या धावांमुळे सामना सुपरओव्हरपर्यंत पोहोचला.
-
"I said to Kane I’ll be apologising for that for the rest of my life" – Ben Stokes on those fortunate four runs that turned the game.#SpiritOfCricket | #WeAreEngland pic.twitter.com/b5bAT6p0M6
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">"I said to Kane I’ll be apologising for that for the rest of my life" – Ben Stokes on those fortunate four runs that turned the game.#SpiritOfCricket | #WeAreEngland pic.twitter.com/b5bAT6p0M6
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 14, 2019"I said to Kane I’ll be apologising for that for the rest of my life" – Ben Stokes on those fortunate four runs that turned the game.#SpiritOfCricket | #WeAreEngland pic.twitter.com/b5bAT6p0M6
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 14, 2019
याच घटनेबद्दल स्टोक्सने विल्यमसनची माफी मागितली आहे. त्याने म्हटले, केन, मी 'त्या' घटनेसाठी तुझी आयुष्यभर माफी मागेन. स्टोक्सने या सामन्यात 84 धावांची उपयुक्त खेळी केली. आणि सामनावीराचा मान पटकावला.