मँचेस्टर - विश्वकरंडक स्पर्धेत आज ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर यजमान इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघात सामना रंगला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा इंग्लंडचा निर्णय फायदेशीर ठरला. सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन याने आक्रमक फलंदाजी करत ७१ चेंडूत १४८ धावांची खेळी केली. महत्वाचे म्हणजे मार्गन याने आपल्या या खेळीत तब्बल १७ षटकांराची 'बरसात' केली.
अफगणिस्तान विरुध्दच्या सामन्यात इंग्लडच्या फलंदाजानी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. यामध्ये कर्णधार मॉर्गनने आक्रमक फलंदाजी करताना ५७ चेंडूंमध्ये शतक झळकावले. मॉर्गनच्या या खेळीमध्ये ४ चौकार आणि १७ षटकारांचा समावेश आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी याने आपल्याच गोलंदाजीवर मॉर्गनला बाद केले.
विश्वकरंडक स्पर्धेत इंग्लंडने ४ लढतींमधून तीन विजयांसह ६ गुणांची कमाई केली असून इंग्लड आज चौथ्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे.