लीड्स - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान सामना चालू आहे. गुणतालिकेत अग्रस्थान पटकावण्यासाठी भारताला आजच्या सामन्यात विजय आवश्यक आहे. भारताने गुणतालिकेत अव्वल राहावे यासाठी सर्व चाहते भारताला पाठिंबा देत आहेत. त्याचप्रमाणे मागच्या सामन्यात उपस्थित राहिलेल्या 87 वर्षांच्या पटेल आजी याही सामन्यात हजर राहून भारताला पाठिंबा देत आहेत.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पटेल आजी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या होत्या. विराट आणि रोहितने त्यांची भेट घेतली होती. विराटने पटेल आजींना आजच्या सामन्यात उपस्थित राहण्यासाठी आग्रह धरला होता. पण त्यांच्याकडे तिकीट नसल्याने विराटने त्यांना 'मै हूँ ना' म्हणत वचन दिले होते. आणि त्याने ते वचन पाळले.
-
Hello Charulata ji. #TeamIndia captain @imVkohli promised her tickets and our superfan is here with us is in Leeds.😊 #CWC19 pic.twitter.com/lKqbVllLjc
— BCCI (@BCCI) July 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Hello Charulata ji. #TeamIndia captain @imVkohli promised her tickets and our superfan is here with us is in Leeds.😊 #CWC19 pic.twitter.com/lKqbVllLjc
— BCCI (@BCCI) July 6, 2019Hello Charulata ji. #TeamIndia captain @imVkohli promised her tickets and our superfan is here with us is in Leeds.😊 #CWC19 pic.twitter.com/lKqbVllLjc
— BCCI (@BCCI) July 6, 2019
विराटने चारुलता आजीसाठी लीड्समध्ये होणारा श्रीलंकेविरुध्दचा सामना आणि उपांत्य फेरीच्या सामन्याची तिकीटे पाठवून दिली होती. याची माहिती चारुलता यांच्या नातीने दिली होती. दरम्यान, उद्योजक आनंद महिद्रा यांनी चारुलता आजींना उत्साह पाहून पुढील सामन्याचे तिकीट देणार असल्याचे जाहीर केले होते.