ब्रिस्टॉल -विश्वकरंडकात शनिवारी खेळल्या गेलेल्या चौथ्या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात अफगाणिस्तानचे दोन्ही सलामिवीर शुन्यावर माघारी परतले. त्यानंतर रेहमत शाह आणि नजीबउल्लाह झादरानच्या फलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्ताने २०० चा टप्पा पार केला .
अफगाणिस्तानाच्या संघाने सर्वबाद २०७ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून नजीबुल्लाह झादरान याने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि अॅडम झम्पा यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.
अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर 208 धावांचे आव्हान समोर ठेवले. फिंचने ४९ चेंडूत सहा चौकार आणि चार षटकार मारत ६६ धावा केल्या. तर वॉर्नरने ११४ चेंडूत ८९ धावा केल्या. या सामन्यात वॉर्नरच्या जोरदार खेळीने, ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानवर ७ गडी राखून विजय मिळवला.