लंडन - यंदाच्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेला दुखापतींचे ग्रहण लागले आहे. अशातच वेस्ट इंडिजच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल दुखापतीमुळे संपूर्ण विश्वचषकातून बाहेर पडला आहे.
![andre russell](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/d9rsg8yxkae5_tw_2206newsroom_1561160984_379.jpg)
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार आंद्रे रसेलच्या जागी आता सुनील आंब्रीसचा संघात समावेश करण्यात आला आहे. वेस्ट इंडिजने ६ सामन्यात फक्त १ विजय मिळवला आहे, तर ४ सामन्यात पराभव पत्करला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत न्यूझीलंडने वेस्ट इंडिजवर अवघ्या ५ धावांनी मात करत विजय मिळवला होता.