ETV Bharat / sports

अंबाती रायडूला सापत्न वागणूक, गौतम गंभीरनंतर माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचेही निवड समितीवर ताशेरे

'जो खेळाडू आयपीएल आणि देशासाठी चांगली कामगिरी करतो. शतके आणि अर्धशतके झळकावतो. त्याचबरोबर तो पूर्णपणे फिट असतो, अशा खेळाडूला निवृत्ती घ्यावी लागणे, हे फारच वाईट आहे. भारतीय क्रिकेटसाठी ही निराशादायी घटना आहे,' असेही गंभीर म्हणाला.

author img

By

Published : Jul 4, 2019, 6:35 PM IST

गौतम गंभीर, अंबाती रायडू

नवी दिल्ली - भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय बुधवारी जाहीर केला. या निर्णयानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंकडून विविध प्रतिक्रिया उमटल्या. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने निवड समितीलाच लक्ष्य केले आहे. रायडूच्या निवृत्तीला निवड समितीच जबाबदार असल्याचे विधान गंभीरने केले आहे.

यानंतर माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी निवड समितीच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. 'वर्ल्डकपमध्ये आता संधी मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर अंबाती रायुडूने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हा निर्णय दुर्देवी आहे. निवड समितीने रायडूला सापत्न वागणूक दिली. विजय शंकर आणि मयंक अगरवाल हेही चांगले खेळाडू आहेत. मात्र, रायडूवर अन्याय झाला हे नाकारता येणार नाही. निवड समितीने रायडूला वर्ल्डकपसाठी मी संघ निवडला असता तर रायडू नक्कीच त्यामध्ये असता,' असे संदीप पाटील म्हणाले. रायडूच्या निवृत्तीच्या निर्णयावरुन अनेकांनी एमएसके प्रसाद यांच्या निवड समितीवर जोरदार टीका केली.

'विश्वचषकात निवड समितीने निराश केले आहे. रायडूच्या निवृत्तीलाही निवड समितीच जबाबदार आहे. निवड समितीमध्ये सध्या पाच सदस्य आहेत. पण या पाच सदस्यांनी मिळून जेवढ्या धावा केल्या नाहीत तेवढ्या एकट्या रायडूच्या नावावर आहेत. विश्वकरंडकात शिखर धवन आणि विजय शंकर यांना दुखापत झाली. त्यांच्याजागी रिषभ पंत आणि मयंक अगरवाल यांची निवड करण्यात आली. पण निवड समितीने यावेळी रायडूच्या नावाचा विचारही केला नाही. ही दुर्देवी गोष्ट आहे,' असे गंभीर याने म्हटले आहे.

'जो खेळाडू आयपीएल आणि देशासाठी चांगली कामगिरी करतो. शतके आणि अर्धशतके झळकावतो. त्याचबरोबर तो पूर्णपणे फिट असतो, अशा खेळाडूला निवृत्ती घ्यावी लागणे, हे फारच वाईट आहे. भारतीय क्रिकेटसाठी ही निराशादायी घटना आहे,' असेही गंभीर म्हणाला.

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यावरही टीकेची झोड उठली आहे. कोहली याने रायडूला निवृत्तीनंतर पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. रायडूवर अन्याय होण्यात कोहलीलाही जबाबदार धरण्यात येत आहे.

Intro:Body:

अंबाती रायडूला सापत्न वागणूक, गौतम गंभीरनंतर माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचेही निवड समितीवर ताशेरे

नवी दिल्ली - भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय बुधवारी जाहीर केला. या निर्णयानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंकडून विविध प्रतिक्रिया उमटल्या. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने निवड समितीलाच लक्ष्य केले आहे. रायडूच्या निवृत्तीला निवड समितीच जबाबदार असल्याचे विधान गंभीरने केले आहे.

यानंतर माजी क्रिकेटपटून संदीप पाटील यांनी निवड समितीच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. 'वर्ल्डकपमध्ये आता संधी मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर अंबाती रायुडूने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हा निर्णय दुर्देवी आहे. निवड समितीने रायडूला सापत्न वागणूक दिली. विजय शंकर आणि मयंक अगरवाल हेही चांगले खेळाडू आहेत. मात्र, रायडूवर अन्याय झाला हे नाकारता येणार नाही. निवड समितीने रायडूला वर्ल्डकपसाठी मी संघ निवडला असता तर रायडू नक्कीच त्यामध्ये असता,' असे संदीप पाटील म्हणाले. रायडूच्या निवृत्तीच्या निर्णयावरुन अनेकांनी एमएसके प्रसाद यांच्या निवड समितीवर जोरदार टीका केली.

'विश्वचषकात निवड समितीने निराश केले आहे. रायडूच्या निवृत्तीलाही निवड समितीच जबाबदार आहे. निवड समितीमध्ये सध्या पाच सदस्य आहेत. पण या पाच सदस्यांनी मिळून जेवढ्या धावा केल्या नाहीत तेवढ्या एकट्या रायडूच्या नावावर आहेत. विश्वचषकात शिखर धवन आणि विजय शंकर यांना दुखापत झाली. त्यांच्याजागी रिषभ पंत आणि मयंक अगरवाल यांची निवड करण्यात आली. पण निवड समितीने यावेळी रायडूच्या नावाचा विचारही केला नाही. ही दुर्देवी गोष्ट आहे,' असे गंभीर याने म्हटले आहे.

'जो खेळाडू आयपीएल आणि देशासाठी चांगली कामगिरी करतो. शतके आणि अर्धशतके झळकावतो. त्याचबरोबर तो पूर्णपणे फिट असतो, अशा खेळाडूला निवृत्ती घ्यावी लागणे, हे फारच वाईट आहे. भारतीय क्रिकेटसाठी ही निराशादायी घटना आहे,' असेही गंभीर म्हणाला.

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यावरही टीकेची झोड उठली आहे. कोहली याने रायडूला निवृत्तीनंतर पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. रायडूवर अन्याय होण्यात कोहलीलाही जबाबदार धरण्यात येत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.