मुंबई - न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. भारताच्या या कसोटी संघात रोहित शर्मा, केएल राहुल, युझवेंद्र चहल नसल्यामुळे भारताचा पराभव झाल्याची चर्चा नेटकरी करत आहेत. हिटमॅन रोहित शर्माला दुखापतीमुळे न्यूझीलंड दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतावे लागले होते. त्यानंतर रोहित एका नव्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आला आहे. या व्हिडिओत रोहित भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलला मारहाण करत आहे.
-
We are back 😂😂 @ImRo45 @imK_Ahmed13 pic.twitter.com/THo3qiD7Qt
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) February 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We are back 😂😂 @ImRo45 @imK_Ahmed13 pic.twitter.com/THo3qiD7Qt
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) February 25, 2020We are back 😂😂 @ImRo45 @imK_Ahmed13 pic.twitter.com/THo3qiD7Qt
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) February 25, 2020
हेही वाचा - अखेर ठरलं!...धोनी 'या' दिवशी मैदानात उतरणार
टिकटॉक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युझवेंद्र चहल जबरदस्त अॅक्टिव असतो. त्याचा दोन मुलींसोबतचा टिकटॉक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान हिट झाला होता. आता चहलने आपल्या टिकटॉकच्या अकाउंटवरून नवीन व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये चहल, रोहित शर्मा आणि खलील अहमद यांनी भाग घेतला असून रोहित आणि खलील चहलला मजेशीररीत्या मारहाण करताना दिसून आले आहेत.
न्यूझीलंडविरूद्धच्या टी-२० मालिकेत भारताने दिमाखदार विजय नोंदवला. मालिकेतील विजयानंतर रोहितला वन डे आणि कसोटी मालिकेला मुकावे लागले. या मालिकेतील पाचव्या सामन्यात रोहितला दुखापत झाली होती.