ETV Bharat / sports

चहल-धनश्रीने शेअर केले संगीत कार्यक्रमाचे फोटो - युझवेंद्र चहल धनश्री वर्मा यांचे लग्न न्यूज

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू गोलंदाज युझवेंद्र चहल याने मागील आठवड्यात गुरूग्राम येथे काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये धनश्री वर्मा हिच्याशी विवाह केला. दोघांनी विवाह सोहळ्यातील संगीत कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत.

yuzvendra chahal and dhanashree verma shared their sangeet ceremony pics
चहल-धनश्रीने शेअर केले संगीत कार्यक्रमाचे फोटो
author img

By

Published : Dec 27, 2020, 5:15 PM IST

गुरुग्राम - भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू गोलंदाज युझवेंद्र चहल याने मागील आठवड्यात गुरूग्राम येथे काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये धनश्री वर्मा हिच्याशी विवाह केला. विवाहानंतर चहल आणि धनश्री या दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करण्याचा सपाटा लावला आहे. काही तासांपूर्वीच आता दोघांनी विवाह सोहळ्यातील संगीत कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत.

संगीत कार्यक्रमाच्या शेअर केलेल्या फोटोत चहल धनश्रीसोबत पोझ देताना पाहायला मिळत आहे. चहलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्याने, माझ्या राणीशी भेट, संगीत सोहळ्याचा दिवस, असे कॅप्शन दिले आहे. तर दुसरीकडे धनश्रीने शेअर केलेल्या फोटोला, हे प्रिंन्स, चला डान्स करू, असे कॅप्शन दिले आहे.

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी युएईला रवाना होण्याआधी चहल आणि धनश्री यांनी साखरपुडा केला. धनश्री हे कोरिओग्राफर असून लॉकडाउन काळात दोघांची ओळख झाली. या ओळखीचे रुपातंर प्रेमात झाले आणि चहलने धनश्रीला लग्नासाठी मागणी घातली.

धनश्री आयपीएलदरम्यान चहलला पाठिंबा देण्यासाठी युएईत दाखल झाली होती. विशेष म्हणजे, या आयपीएल हंगामात चहलची कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्याने १५ सामन्यात २१ गडी बाद केले.

हेही वाचा - ICC च्या संघात भारतीयांचा बोलबाला; पाकिस्तानची पाटी रिकामी

हेही वाचा - धोनी नाम ही काफी है! दशकातील सर्वोत्तम आयसीसी एकदिवसीय आणि टी-२० संघाचे नेतृत्व माहीकडे

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.