ETV Bharat / sports

विश्वचषक संपू द्या...धोनीचं पितळ उघडं पाडणार; युवराजच्या वडिलांचा इशारा

आपल्या मुलाच्या निवृत्तीला महेंद्रसिंह धोनी कारणीभूत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप युवराजचे वडील योगीराज सिंह यांनी केला आहे. त्यांनी हा आरोप एका मुलाखतीदरम्याने केला आहे.

author img

By

Published : Jun 15, 2019, 5:02 PM IST

Updated : Jun 15, 2019, 5:15 PM IST

योगीराज सिंग

मुंबई - भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला. यावर क्रिकेटविश्वात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. बीसीसीआयने युवराजला निवृत्त होण्यापूर्वी एक सामना खेळू द्यायला हवे होते, असे मत क्रिकेट प्रेमींमधून व्यक्त होत आहे. यावर युवराजचे वडील योगीराज सिंग यांनी आपल्या मुलाच्या निवृत्तीला महेंद्रसिंह धोनी कारणीभूत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला आहे. त्यांनी हा आरोप एका मुलाखतीदरम्याने केला आहे.

युवराज सिंग हा संघातील राजकारणाचा बळी ठरला असून युवराजच्या निवृत्तीमागे कट असल्याचा गंभीर आरोत त्यांनी केला आहे. भारतीय संघातील व्ही.व्ही.एस.लक्ष्मण, गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग यासारख्या खेळाडूंना योग्य पद्धतीने निरोप दिला गेला नाही. आता युवराजच्या बाबतीतही तेच घडलं. या सगळ्या प्रकाराला एकमेव माणूस जबाबदार असल्याचा आरोप योगीराज सिंग यांनी धोनीचे नाव न घेता केला आहे.

मुलाखतीदरम्यान, आपला रोख धोनीकडे आहे का असे विचारले असता, त्यावर योगीराज म्हणाले, सद्या विश्वचषक सुरू आहे. त्यामुळं मी कोणत्याही खेळाडूचे नाव घेऊन खच्चीकरण करणार नाही. मागील १५ वर्षांपासून एक खेळाडू अनेकांचे करियर संपवलं आहे. विश्वचषक संपल्यानंतर घडलेल्या सगळ्या गोष्टी समोर आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Intro:Body:

news

Conclusion:
Last Updated : Jun 15, 2019, 5:15 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.