मुंबई - पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी कोरोनामुळे पीडित असलेल्यांना आणि गरजू लोकांना मदत करत आहे. आफ्रिदीच्या या प्रयत्नांना भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह आणि हरभजन सिंग यांनी सोशल मीडियावरून पाठिंबा दिला. पण, ही बाब भारतीय चाहत्यांना रुचली नाही. त्यांनी सोशल मीडियावर या दोघांनाही ट्रोल केले. अनेकांनी तर तुम्हाला लाज वाटत नाही का असा प्रश्न विचारला. विशेष म्हणजे भारतात #ShameOnYuviBhajji हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे. आता या प्रकरणावर युवीने उत्तर दिले आहे.
युवीने या संदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो, 'मला हे कळत नाही, की मी जो मॅसेज केला होता, तो गरजूंना मदत मिळावी यासाठी होता. त्याला चुकीच्या पद्धतीने घेण्यात येत आहे. माझा हेतू कोणाच्या भावना दुखवायचा नव्हता. कोरोनामुळे पीडित असलेल्या गरजूंना मदत मिळो, हाच हेतू माझा होता. मी एक भारतीय आहे आणि मी नेहमी मानवतेसाठी उभा राहीन. जय हिंद.'
- — yuvraj singh (@YUVSTRONG12) April 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— yuvraj singh (@YUVSTRONG12) April 1, 2020
">— yuvraj singh (@YUVSTRONG12) April 1, 2020
दरम्यान, याआधी युवराजने व्हिडिओच्या माध्यमातून, कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी आफ्रिदीच्या संस्थेला मदत करा, असे आवाहन केले होते. युवीचे हे आवाहन चाहत्यांना रुचले नाही आणि त्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली. चाहत्यांशिवाय भाजप आमदार राम कदम यांनी देखील युवी आणि हरभजन यांच्या विधानावर आपेक्ष नोंदवला. त्यांनी दोघांनाही आपले विधान मागे घेत भारतासाठी मदतीचे आवाहन करायला हवे, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा - अशी घ्या आयपीएल..! राजस्थान रॉयल्सने काढला तोडगा
हेही वाचा - हरभजन पाकिस्तानला म्हणतोय 'पंगा मत लेना', शेअर 'तो' व्हिडिओ