कोलकाता- ईडन गार्डनवर भारत आणि बांगलादेशचा पहिला अंतरराष्ट्रीय दिवस-रात्र कसोटी सामना सुरु आहे. भारतीय संघाने आक्रमक खेळी करत केवळ १०६ धावांवर बांगलादेशला गारद केले. उमेश यादव, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा सारख्या त्रिकुटाने जरी या सामन्यात विशेष कामगिरी केली असली तरी भारताचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहाने एक वेगळाच विक्रम केला आहे आणि हा विक्रम धोनीच्या विक्रमाच्या बरोबरीचा आहे.
वृद्धीमान साहाने या कसोटी क्रिकेटमध्ये आपला शंभरावा बळी घेतला आहे. बांगलादेशचा सलामीवीर शादमान इस्लामचा झेल पकडत त्याने आपला शंभराव्या बळीची नोंद केली आहे. साहाचा हा विक्रम धोनीच्या सर्वात कमी कसोटी सामन्यात शंभर बळी घेण्याच्या विक्रमाच्या बरोबरीचा आहे.
'हे' आहेत सर्वात कमी कसोटी सामन्यात १०० बळी घेणारे यष्टीरक्षक-
- महेंद्रसिंह धोनी/वृद्धीमान साहा – ३५ कसोटी
- किरण मोरे – ३९ कसोटी
- नयन मोंगिया – ४१ कसोटी
- सय्यद किरमाणी – ४२ कसोटी