मुंबई - भारतीय संघाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने विस्डेनच्या पाच सर्वश्रेष्ठ खेळाडूंच्या यादीत रोहित शर्माचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स विस्डेन २०१९ चा सवोत्कृष्ठ खेळाडू ठरला आहे. तर महिलामध्ये ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी सर्वोत्कृष्ठ ठरली.
लक्ष्मण म्हणाले, 'रोहितने २०१९ च्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धत पाच शतकं केली आहेत. तो विस्डनच्या सर्वोत्कृष्ठ खेळाडूंच्या पुरस्कारासाठी पात्र होता. पण मला रोहितचे नाव पहिल्या पाचमध्येदेखील नाही. याचे मला आश्चर्य वाटते.'
अॅशेस मालिका मोठी मालिका समजली जाते. पण विश्वकरंडक स्पर्धेत पाच शतके करणे मोठी बाब आहे. रोहितने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात महत्वपूर्ण खेळी केली होती. मी असो कोणी दुसरा क्रिकेट जाणकार असो विस्डनच्या घोषणेवर आश्चर्य व्यक्त करेलच, असेही लक्ष्मण म्हणाले.
दरम्यान, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या वर्चस्वाला जोरदार धक्का देत तो २०१९ सालचा जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू बनला आहे. 'विस्डन'ने बेन स्टोक्सचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरव केला आहे. विराटने मागील सलग ३ वर्षे विस्डनचा सर्वोत्तम खेळाडू होण्याचा बहुमान मिळवला आहे. हा एक विक्रम आहे.
बेन स्टोक्सने २०१९ विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरमध्ये १५ धावा चोपल्या होत्या. यानंतर त्याने अॅशेस मालिकेतील हेंडिग्लेच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सर्वश्रेष्ट खेळी केली. त्याने नाबाद १३५ धावांची खेळी करत इंग्लंडला एक विकेट राखून विजय मिळवून दिला होता.
विस्डनने महिला खेळाडूमध्ये ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीची सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड केली आहे. पेरीने अॅशेस मालिकेत चांगली कामगिरी केली होती. त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. तिने कँटरबरी कसोटीमध्ये शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करताना २२ धावांमध्ये ७ गडी बाद केले होते. तर टॉटन कसोटीत तिने पहिल्या डावात ११६ आणि दुसऱ्या डावात ७६ धावांची खेळी केली होती.
हेही वाचा - भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार म्हणते, विराटच्या नव्हे तर धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल
हेही वाचा - 'धोनी अद्भूत, टीम इंडियाला त्याच्यासारखा खेळाडू मिळणं कठीण, निवृत्तीसाठी दबाव टाकू नका'